सोलापूर(प्रतिनिधी) एमआय डीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. प्रमोद वाघमारे यांना राष्ट्रपती पदक उत्कृष्ट व उल्लेखनीय सेवेसाठी देशपातळीवर गौरव
सोलापूर(प्रतिनिधी ) शहरातील MIDC पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. प्रमोद वाघमारे यांना त्यांच्या उत्कृष्ट, प्रामाणिक व उल्लेखनीय सेवेसाठी भारत सरकारकडून मा. राष्ट्रपतींचे राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. हा सन्मान सोलापूर पोलीस दलासह संपूर्ण शहरासाठी अभिमानाचा क्षण आहे.
कर्तव्यनिष्ठ सेवेतून घडलेला विश्वास
श्री. प्रमोद वाघमारे यांनी आपल्या सेवाकाळात कायद्याची अंमलबजावणी, शिस्त, पारदर्शकता आणि मानवी दृष्टिकोन यांचा समतोल साधत कार्य केले. औद्योगिक परिसर, कामगार वसाहती, रहिवासी भाग तसेच संवेदनशील ठिकाणी त्यांनी शांतता व सुरक्षितता अबाधित ठेवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले.
कायदा–सुव्यवस्थेचे प्रभावी व्यवस्थापन
MIDC परिसरात कायदा–सुव्यवस्था राखताना त्यांनी
गंभीर प्रकरणांमध्ये तत्पर व अचूक तपास केला आहे त्याच बरोबर पोलीस ठाण्यात प्राप्त झालेल्या
तक्रारींवर वेळेत कारवाई केली आहे पोलीस ठाण्यातील बंदोबस्त यासह अनेक बाबीवर प्रभावी नियोजन केलं असून त्यांनी हद्दीतील नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना कशी निर्माण होईल
यावर विशेष भर दिला. त्यांच्या नेतृत्वाखाली MIDC पोलीस ठाण्याची कामगिरी अधिक सक्षम व परिणामकारक झाली आहे.
