Type Here to Get Search Results !

दुय्यम निबंधक कार्यालयातील झिरो कर्मचाऱ्यांची हाकालपट्टी करा पत्रकार अमोल कुलकर्णी यांचे 26 जानेवारी पासून बेमुदत धरणे आंदोलन




सोलापूर (प्रतिनिधी ) शहरातील उत्तर १, उत्तर २, उत्तर ३ आणि दक्षिण येथील दस्त नोंदणी (सह दुव्यम निबंधक) कार्यालयात गेली अनेक वर्षांपासून खाजगी झिरो कर्मचारी बेकायदेशीर रित्या काम करत असून शासकीय दप्तर कागदपत्रे हाताळणे अभिलेख कक्षात बसून कागदपत्रे शोधणे दस्त व इंडेक्स वर सही शिके मारणे त्याच बरोबर खरेदी विक्री व्यवहार बाबत एजंटांना हाताशी धरून काम करत निदर्शनात येत असून इंडेक्स व अभिलेख कक्षातील जुने रेकॉर्ड काढण्यासाठी ज्यादा पैशाची मागणी करणे या सह अनेक नियमबाह्य कामे झिरो कर्मचारी करत असल्याचा आरोप पत्रकार अमोल कुलकर्णी यांनी आपल्या तक्रारीत केला असून याबाबत पत्रकार कुलकर्णी यांनी जिल्हा मुद्रांक अधिकारी यांच्या कडे दिनांक २७/११/२०२५ रोजी लेखी स्वरूपाची तक्रार केली होती तब्बल एक महिना उलटला तरी मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयाकडून तक्रारी च्या अनुषंगाने कोणताही पत्र व्यवहार झालेला नाही त्याच बरोबर झिरो कर्मचाऱ्यांनाची हाकाल पट्टी देखील केलेली नाही म्हणून पत्रकार अमोल कुलकर्णी यांनी 26 जानेवारी पासून बेमुदत धरणे आंदोलन सुरु ठेवले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.