Type Here to Get Search Results !

अवघ्या दोन वर्षात कार्यसम्राट न्यूज चे तब्बल 03 लाख 50,000 हजार वाचक वर्ग : निरपेक्ष निर्भीड अन सडेतोड बातम्यांचा झंजावात जोमाने सुरूच

 



सोलापूर (प्रतिनिधी ) जेष्ठ पत्रकार तथा कार्यसम्राट न्यूज चे संपादक यशवंत पवार यांनी पत्रकारिता एक वसा चळवळ ध्यास समजून समाजातील दुःखी पिढी वंचित घटकांच्या न्याय हक्कासाठी त्याचबरोबर अत्याचार ग्रस्त अन्यायग्रस्त लोकांचे प्रश्न प्रशासन दरबारात मांडून त्यांच्या हितासाठी विकासासाठी नेहमीच कार्यसम्राट न्यूज च्या लेखणीच्या माध्यमातून प्रश्न मांडून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे कार्यसम्राट न्यूज च्या माध्यमातून सोलापूर शहर जिल्हा सह महाराष्ट्र राज्यातील सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व राजकीय बातम्यांचा आढावा घेऊन कार्यसम्राट न्यूज ने महाराष्ट्र राज्यात एक आगळावेगळा ठसा त्याच बरोबर आदरयुक्त दबदबा निर्माण केला असून केवळ अन केवळ अवघ्या दोन वर्षात तब्बल 03 लाख 50,000 हजार वाचक वर्ग निर्माण केला असून समाजातील वंचित पिढीत घटकासाठी कार्यसम्राट न्यूज चे नेहमीच आक्रमक भूमिका घेतली असून समाजातील अन्यायग्रस्त अत्याचार ग्रस्त व्यक्तींची बाजू प्रशासन दरबारात बातमीच्या माध्यमातून मांडून त्यांना न्याय देण्याची भूमिका पार पाडली आहे. निरपेक्ष निर्भीड अन सडेतोड बातम्या मुळे कार्यसम्राट न्यूज महाराष्ट्र राज्यात नेहमी चर्चेत राहिले असून




  कार्यसम्राट न्यूज मधील पत्रकारिता ही व्यवसाय नसून केवळ सामाजिक बांधिलकी असल्याचे संपादक यशवंत पवार यांनी आवर्जून सांगितले असून समाजाच्या ऋणातून उतराई होण्यासाठी आपण पत्रकारिता करत असून यापुढेही समाजातील वंचित पीडित घटकाच्या न्याय हक्कासाठी कार्यसम्राट न्यूज त्याच जोमाने व ताकदीने प्रशासन दरबारात लेखणीच्या माध्यमातून आवाज काढत तळागाळातील लोकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे ही संपादक यशवंत पवार यांनी नमूद करून कार्यसम्राट न्यूज च्या सर्व वाचकांचे आभार मानले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.