Type Here to Get Search Results !

सुस्त प्रशासन मस्तवाल झिरो कर्मचारी जिल्हा मुद्रांक अधिकाऱ्यांना आंदोलन स्थळी येण्यास वेळ नाही पत्रकार कुलकर्णी यांच्या आंदोलनाचा आज 4 था दिवस




सोलापूर (प्रतिनिधी ) शहरातील दुय्यम निबंधक कार्यालयाय मधील झिरो कर्मचाऱ्यांची हाकालपट्टी करणे बाबत पत्रकार अमोल कुलकर्णी यांनी 26 जानेवारी पासून जिल्हाधिकारी कार्यालय समोर बेमुदत धरणे आंदोलन करत असून आज बेमुदत धरणे आंदोलनाचा आज 4 था दिवस असून अद्याप मुद्रांक जिल्हाधिकारी यांनी आंदोलन स्थळी भेट दिली नसल्याने पत्रकार अमोल कुलकर्णी यांनी संताप व्यक्त केला आहे

शहरातील उत्तर १, उत्तर २, उत्तर ३ आणि दक्षिण येथील दस्त नोंदणी (सह दुव्यम निबंधक) कार्यालयात गेली अनेक वर्षांपासून खाजगी झिरो कर्मचारी बेकायदेशीर रित्या काम करत असून शासकीय दप्तर कागदपत्रे हाताळणे अभिलेख कक्षात बसून कागदपत्रे शोधणे दस्त व इंडेक्स वर सही शिके मारणे त्याच बरोबर खरेदी विक्री व्यवहार बाबत एजंटांना हाताशी धरून काम करत निदर्शनात येत असून इंडेक्स व अभिलेख कक्षातील जुने रेकॉर्ड काढण्यासाठी ज्यादा पैशाची मागणी करणे या सह अनेक नियमबाह्य कामे झिरो कर्मचारी करत असल्याचा आरोप पत्रकार अमोल कुलकर्णी यांनी आपल्या तक्रारीत केला असून याबाबत पत्रकार कुलकर्णी यांनी जिल्हा मुद्रांक अधिकारी यांच्या कडे दिनांक २७/११/२०२५ रोजी लेखी स्वरूपाची तक्रार केली होती तब्बल एक महिना उलटला तरी मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयाकडून तक्रारी च्या अनुषंगाने कोणताही पत्र व्यवहार झालेला नाही त्याच बरोबर झिरो कर्मचाऱ्यांनाची हाकाल पट्टी देखील केलेली नाही म्हणून पत्रकार अमोल कुलकर्णी यांनी 26 जानेवारी पासून बेमुदत धरणे आंदोलन सुरु ठेवले आहे. खरेदी विक्री कार्यालयातील झरो कर्मचारी हाकालपट्टी बाबत मुद्रांक जिल्हाधिकारी का मौन बाळगून आहेत?हे अद्याप गुलदस्त्यात असून एका पत्रकाराला आपल्या तक्रारी बाबत चक्क रस्त्यावर उतरून बेमुदत धरणे आंदोलन करावे लागत आहे ही मुद्रांक जिल्हाधिकारी यांच्या बाबतीत अतिशय खेदाची बाबत असून दुय्यम निबंधक कार्यालयातील झिरो कर्मचारी सरकारचे जावई आहेत का? असा प्रश्न निर्माण झाला असून सोलापूर शहरातील खरेदी विक्री कार्यालयातील झिरो कर्मचाऱ्यांची कार्यालय बाहेर हाकालपट्टी करण्यासाठी मुद्रांक जिल्हाधिकारी कोणता मुहूर्त शोधत आहेत? याची आता पाहणी करावी लागेल.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.