Type Here to Get Search Results !

सोलापूर भाजपला मोठा धक्का; कल्याणी हलसंगींसह पदाधिकाऱ्यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश.




सोलापूर (प्रतिनिधी ) महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप जिल्हा कार्यकारिणी सदस्य श्री. कल्याणी हलसंगी आणि किसान मोर्चा शहर सरचिटणीस श्री. गजानन हलसंगी यांनी कार्यकर्त्यांसह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जाहीर प्रवेश केला. जिल्हाप्रमुख डॉ. प्रा. अजय दासरी यांनी सर्वांचे शिवबंधन बांधून पक्षात स्वागत केले.

यावेळी उपजिल्हाप्रमुख दत्ता गणेशकर, प्रताप चव्हाण, शहरप्रमुख नाना मोरे, जिल्हा संघटक जगदीश कलकेरी, डॉ. प्रितम उपलप, पंकज गजकोश, सुरेश शिंदे, अंबादास चव्हाण आणि रवी नायक म्हेत्रे या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या पक्षप्रवेशामुळे सोलापुरात शिवसेनेची ताकद वाढली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.