Type Here to Get Search Results !

अखिल भारतीय भ्रष्टाचार संघर्ष निर्मूलन समितीच्या महाराष्ट्र प्रदेश सेक्रेटरी पदी गणेश कदम यांची नियुक्ती




सोलापूर (प्रतिनिधी ) अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या माध्यमातून आज पर्यंत अनेक आंदोलन उपोषण करण्यात आली आहेत अनेकांच्या समस्या सोडवण्यासाठी देखील प्रयत्न करण्यात आले राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप बाबा खंडापूरकर यांच्या मार्गदर्शनखाली ही संघटना कार्यरत आहे.

अकलूज येथील सामाजिक कार्यकर्ते गणेश कदम यांनी आजपर्यंत केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांची महाराष्ट्र प्रदेश सेक्रेटरी या पदावर राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अनिल देसले यांनी नियुक्ती केली आहे यावेळी बोलताना कदम यांनी सांगितले की संघटना वाढी साठी व प्रचार व प्रसार करण्या बरोबर सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रमाणिकपणे प्रयत्न करणार आहे दरम्यान त्यांच्या या निवडी बद्दल नातेवाईक मित्र मंडळ यांनी अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.