सोलापूर (प्रतिनिधी) गेल्या आठ वर्षांपासून पत्रकार सुरक्षा समिती राज्यातील पत्रकारांसाठी वेगवेगळ्या स्वरूपाचे आंदोलन उपोषण निवेदन व राज्य सरकारकडे पत्र व्यवहार करून पाठपुरावा करत असून पत्रकार सुरक्षा समिती च्या माध्यमातून जेष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना आरोग्य योजना विमा योजना पत्रकारांसाठी घरकुल योजना ग्रामीण भागातील पत्रकारांना एसटी बसमधून मोफत प्रवास पत्रकारांच्या चारचाकी वाहनास टोल मधून सूट राज्यातील युट्युब व पोर्टल ला शासकीय जाहिराती यादीवर नसलेल्या साप्ताहिक वृत्तपत्राना पूर्वी प्रमाणे जाहिराती खंडणी सारखे गंभीर गुन्हे दाखल प्रकरणी वरिष्ठ अधिकारी मार्फत स्वतंत्र चौकशी पत्रकारांवर होणारे हल्ले धमकी मारहाण या सह राज्यातील पत्रकारांच्या विविध विषयावर पत्रकार सुरक्षा समिती आक्रमक व प्रभावीपणे काम करत असून पत्रकारांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करीत आहे
पत्रकार सुरक्षा समिती मोहोळ तालुका नूतन कार्यकरणी जिल्हा उपाध्यक्ष अमर पवार यांनी जाहीर केली असून मोहोळ तालुका कार्यकारणी पुढील प्रमाणे
तालुका अध्यक्ष सागर पवार उपाध्यक्ष शुक्राचार्य शेंडेकर तालुका संघटक महादेव शेवाळे
तालुका कार्याध्यक्ष सूरज जगताप तालुका सचिव शहाजी शिंदे तालुका खजिनदार प्रवीण फराटे तालुका समन्वयक कैलास सूळ तालुका प्रसिद्धी प्रमुख वजीर मुलाणी
यावेळी प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार जिल्हा सरचिटणीस बंडू तोडकर शुक्राचार्य शेंडेकर वजीर मुलाणी महाराष्ट्र पोलीस वार्ता चे संपादक अमोल कुलकर्णी महादेव शेवाळे उपस्थित होते.
