Type Here to Get Search Results !

बहुचर्चीत मंडल अधिकारी सुखदेव पाटील चौकशीच्या फेऱ्यात ? गंभीर तक्रारी ची सुनावणी लांबणीवर निवडणूक आचारसंहितेचे दिले जातंय कारण




 सोलापूर (प्रतिनिधी) मार्डी चे बहुचर्चीत मंडळ अधिकारी सुखदेव पाटील यांच्या संदर्भातील तक्रारीवरील आजची सुनावणी थांबवण्यात आली. महापालिकेच्या आचारसंहितेचे कारण पुढे करत जिल्हाधिकारी कार्यालयाने ती पुढे ढकलली. यामुळे माडीं परिसरातील तक्रारदार ग्रामस्थांना आल्यापावली परत फिरावे लागले.

जिल्हाधिकारी मंगळवारी कार्यालयात मंडळ अधिकारी सुखदेव पाटील यांच्या संदर्भात दाखल झालेल्या तक्रारी बाबत सुनावणी होती. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बळीराम साठे यांनी यासंदर्भात तक्रार दाखल केली होती. मंडलाधिकारी सुखदेव पाटील हे ग्रामस्थांची विनाकारण अडवणूक करतात, निराधार व गरजू ग्रामस्थांच्या अर्जावर सह्या करण्यास टाळाटाळ करतात त्याचबरोबर लोकप्रतिनिधींना प्रतिसाद देत नाहीत. कार्यालयीन कामासाठी पैसे मागतात अशी गंभीर तक्रार साठे यांनी केल्या होत्या या संदर्भातील सुनावणीसाठी मार्डी परिसरातील जवळपास २० २५ ग्रामस्थ मंगळवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले मात्र तत्पूर्वी तहसीलदार निलेश पाटील यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेतली या नंतर आजची सुनावणी पुढे ढकलण्यात आली असल्याची माहिती साठे व ग्रामस्थांना दिली आहे सध्या महानगर पालिकेची आचारसंहिता सुरू असल्याने ही बैठक घेता येणार नाही अशी भूमिका जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रशासनाने घेतली आहे यानंतर साठे यांनी थेट जिल्हाधिकारी यांची भेट घेतली मंडळ अधिकाऱ्यांचे कामकाज व वर्तणुकीबाबत असणाऱ्या तीव्र भावना सांगितल्या यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी आचारसंहितेनंतर बैठक घेऊ अशा आश्वासन दिले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.