Type Here to Get Search Results !

गुंडोवालों जरा होशियार यहाँ के हम हें राजकुमार सोलापुरातील सराईत गुन्हेगारांना डॅशिंग युवा पोलीस आयुक्त एम राजकुमार यांचा इशारा.




सोलापूर (प्रतिनिधी) आगमो महापालिका

निवडणुकीची आचारसंहिता आता लागू झाली आहे. या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर पोलिसांकडून सात पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील सराईत गुन्हेगारांच्या (शरीराविषयक दोन किंवा त्याहून अधिक गुन्हे दाखल असलेले) याद्या तयार केल्या जात आहेत. त्यातील सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था बिघडेल, असे कृत्य करणाऱ्यांना मतदानापूर्वी आठ-दहा दिवसांसाठी तडीपार केले जाणार आहे. 

सोलापूर शहरात विजापूर नाका, एमआयडीसी, जेलरोड, जोडभावी पेठ, सदर बझार, फौजदार चावडी व सलगर वस्ती अशी सात पोलिस ठाणी आहेत. त्याअंतर्गत अंदाजे दीड हजार सराईत गुन्हेगार आहेत. त्यातील शरीराविषयक गुन्हे दाखल असलेले कितीजण आहेत, प्रतिबंधात्मक कारवाई करूनही कोणाचे वर्तन सुधारलेले नाही, अशांची यादी तयार केली जात आहे. मुंबई पोलिस कायद्यातील कलम ५५ नुसार गुन्हेगारांची टोळी, कलम ५६ नुसार शरीराविषयक दोन किंवा त्यापेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेले आणि कलम ५७ नुसार गुन्ह्यात शिक्षा लागूनही सध्या बाहेर असलेल्या गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई


केली जाते. त्यानुसार महापालिका निवडणुकीच्या मतदानाआधी सुमारे १०० जणांवर, ज्यांच्या वर्तनात सुधारणा झाली नाही अशांवर तात्पुरत्या तडीपारीची कारवाई होऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले.


    *तडीपारींच्या यादीत १८ गुन्हेगार*


मुंबई पोलिस कायदा १९५१ मधील कलम ५५ आणि ५६ नुसार सराईत गुन्हेगारांवर किंवा त्यांच्या टोळीवर तडीपारीची कारवाई केली जाते. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींना किंवा टोळ्यांना विशिष्ट कालावधीसाठी एका भागातून दुसऱ्या भागात जाण्यास प्रतिबंध केले जाते. कलम ५५ टोळ्यांसाठी (दोन किंवा अधिक व्यक्ती) आणि कलम ५६ एका व्यक्तीच्या धोकादायक कृत्यांसाठी वापरले जाते, जे पोलिस कायदा आणि मुंबई पोलिस कायद्यांतर्गत येते. या कलमाअंतर्गत कारवाईसाठी आधी नोटीस देऊन सुधारण्याची संधी दिली जाते, पण सुधारणा न झाल्यास पोलिस प्रशासनाद्वारे त्यांना तडीपार केले जाते सोलापूर शहरातील १८ सराईत गुन्हेगा तडीपारीच्या यादीत असून त्यांच्यावर आगामी काळात कारवाई होणार आहे. एकंदरीत गुंडोवालों जरा होशियार यहाँ के हम हें राजकुमार पुन्हा एकदा डॅशिंग युवा पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी गुन्हेगारांना इशारा दिला आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.