Type Here to Get Search Results !

पत्रकार सुरक्षा समिती सोलापूर शहर समन्वयक पदी युवा पत्रकार लक्ष्मण सुरवसे यांची फेर निवड.




 सोलापूर (प्रतिनिधी) गेल्या आठ वर्षांपासून पत्रकार सुरक्षा समिती राज्यातील पत्रकारांसाठी वेगवेगळ्या स्वरूपाचे आंदोलन उपोषण निवेदन व राज्य सरकारकडे पत्र व्यवहार करून पाठपुरावा करत असून पत्रकार सुरक्षा समिती च्या माध्यमातून जेष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना आरोग्य योजना विमा योजना पत्रकारांसाठी घरकुल योजना ग्रामीण भागातील पत्रकारांना एसटी बसमधून मोफत प्रवास पत्रकारांच्या चारचाकी वाहनास टोल मधून सूट राज्यातील युट्युब व पोर्टल ला शासकीय जाहिराती यादीवर नसलेल्या साप्ताहिक वृत्तपत्राना पूर्वी प्रमाणे जाहिराती खंडणी सारखे गंभीर गुन्हे दाखल प्रकरणी वरिष्ठ अधिकारी मार्फत स्वतंत्र चौकशी पत्रकारांवर होणारे हल्ले धमकी मारहाण या सह राज्यातील पत्रकारांच्या विविध विषयावर पत्रकार सुरक्षा समिती आक्रमक व प्रभावीपणे काम करत असून पत्रकार सुरक्षा समितीच्या सोलापूर शहर समन्वयक पदी साप्ताहिक कार्यसम्राट चे युवा पत्रकार लक्ष्मण सुरवसे यांची फेर निवड केली असून 6 जानेवारी (पत्रकार दिनी ) त्यांचा ओळख पत्र नियुक्ती पत्र शाल व पुष्पगुछ देऊन सत्कार करणार असल्याची माहिती पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार कार्यकारी प्रदेश अध्यक्ष रामचंद्र सरवदे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रमोद भैस पश्चिम महाराष्ट्र संघटक मिर्झा गालिब मुजावर उपसंघटक शंकर माने पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष कलीम शेख मराठवाडा विभाग कार्याध्यक्ष प्रवीण राठोड सोलापूर जिल्हा अध्यक्ष राम हुंडारे जिल्हा कार्याध्यक्ष अतुल भडंगे जिल्हा सचिव अंबादास गज्जम जिल्हा उपाध्यक्ष अमर पवार सरचिटणीस बंडू तोडकर सोलापूर शहर अध्यक्ष आन्सर तांबोळी कार्यकारी शहर अध्यक्ष वसीम राजा बागवान कार्याध्यक्ष राजू वग्गू प्रसिद्धी प्रमुख अमोल कुलकर्णी यांनी दिली आहे 


*युवा पत्रकार लक्ष्मण सुरवसे यांचा अल्प परिचय*

 युवा पत्रकार लक्ष्मण सुरवसे हे सोलापूर येथील रहिवाशी असून त्यांना सामाजिक कार्यात तसेच पत्रकारिता मध्ये आवड असून त्यांनी पत्रकारिता बरोबरच अनेक सामाजिक उपक्रमात सहभाग घेतला आहे ते सर्वसामान्य माणसाच्या अडचणीत धावून त्यांना मदत करतात शांत संयमी व नेहमी व प्रेमळ असणाऱ्या युवा पत्रकार लक्ष्मण सुरवसे यांनी साप्ताहिक कार्यसम्राट च्या माध्यमातून जनतेचे प्रश्न शासकीय कार्यालयात मांडून त्यांची कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांची पत्रकार सुरक्षा समितीने सोलापूर शहर समन्वयक या पदाची पुन्हा जबाबदारी दिली आहे युवा पत्रकार लक्ष्मण सुरवसे यांची पत्रकार सुरक्षा समिती शहर समन्वयक पदी फेर नियुक्ती झाल्याने त्यांचे कौतुक असून त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.