फलटण (प्रतिनिधी )पत्रकार सुरक्षा
गेल्या आठ वर्षांपासून पत्रकार सुरक्षा समिती पत्रकारांच्या हक्कासाठी सक्रिय असून, प्रभावी पत्रकार संरक्षण कायदा, ज्येष्ठ पत्रकारांसाठी समान पेन्शन, पत्रकार आरोग्य व विमा योजना, साप्ताहिक वृत्तपत्रांना जाहिरात धोरण, युट्यूब व पोर्टल पत्रकारांना शासकीय मान्यता, ग्रामीण पत्रकारांसाठी एसटीमध्ये मोफत प्रवास अशा विविध मागण्यांसाठी समिती सातत्याने आंदोलन, उपोषण, निवेदन व शासनाशी पत्रव्यवहार करत आहे. पत्रकारितेबरोबरच सामाजिक बांधिलकी जोपासत, समिती दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करत असते. यंदा पत्रकार सुरक्षा समिती चा आदर्श पत्रकार म्हणून साप्ताहिक कार्यसम्राट चे फलटण तालुका प्रतिनिधी युवा पत्रकार मनोज गायकवाड यांना देण्यात आला आदर्श पत्रकार
पुरस्कारामुळे युवा पत्रकार मनोज गायकवाड यांच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.युवा पत्रकार मनोज गायकवाड हे साप्ताहिक कार्यसम्राट वृत्तपत्र व पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक प्रश्न मांडण्याच्या प्रयत्न केल्याने त्यांना हा पुरस्कार देण्यात आला फलटण जिल्हा सातारा येथील हॉटेल विजय लंच या ठिकाणी पत्रकार सुरक्षा समितीचे सातारा जिल्हा अध्यक्ष विक्रम वाघमारे यांच्या हस्ते सन्मान चिन्ह सन्मान पत्र शाल व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी पत्रकार सुरक्षा समिती चे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार महाराष्ट्र पोलीस वार्ता चे संपादक अमोल कुलकर्णी उपस्थित होते.
