सोलापूर (प्रतिनिधी) इंटरनॅशनल प्लॅन्ड पेरेंटहूड फेडरेशन व ऑस्ट्रेलियन एड यांच्याकडून फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया, सोलापूर शाखेला स्प्रिंट फोर सी.इ. 2025 महाराष्ट्र पूर आपत्कालीन प्रकल्प मंजूर करण्यात आला. सोलापूर जिल्ह्याचे जिल्हा आरोग्याअधिकारी डॉ. संतोष नवले व फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया मुंबई मुख्यालयाचे स्प्रिंट फोर प्रकल्प व्यवस्थापक डॉ. अमित कीटूकले यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उदघाटन हॉटेल निसर्ग एक्झिक्युटीव्ह मध्ये मोठ्या उत्साहात करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इंडियन रेडक्रॉस सोसायटी शाखा सोलापूरचे चेअरमन डॉ. राजीव प्रधान हे होते.
यावेळी जिल्हा अतिरिक्त जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. किशोर घाडगे, डॉ. मोहन शेगर, मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर जिल्हा अध्यक्ष डॉ. अविनाश खांडेकर, अक्कलकोट तालुका आरोग्याधिकारी डॉ. अश्विन करजखेडे, मोहोळ तालुका आरोग्याधिकारी डॉ. अरुण पाथरूडकर, सिव्हिल हॉस्पिटल ए.आर.टी. विभाग वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. अग्रजा चिटणीस -वरेरकर, अक्कलकोट तालुका विस्तार अधिकारी महेश भोरे, एड्स नियंत्रण विभाग जिल्हा कार्यक्रम अधिकारी कृष्णा सकट, भारतीय जैन संघटनेचे राज्य अध्यक्ष केतन शहा, राज्य कार्यकारणी सदस्य श्याम पाटील, फायनान्स ॲडव्हायझर सपना चिट्टे, डॉ. विजया महाजन, स्त्रीरोगतज्ञ डॉ. गौरी कहाते, डॉ. समन खान-तांबोळी, युवा प्रतिनिधी साक्षी सर्वगोड, ऐश्वर्या सावंत, डॉ. सोनाक्षी टेकाडे, विभागीय उपाध्यक्ष अभिनंदन विभूते, विभागीय महिलाअध्यक्ष माया पाटील, जिल्हाध्यक्ष देशभूषण वसाळे, साईबाबा प्रशाला मुख्याध्यापक तिपन्ना कोळी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
*यावेळी डॉ. अमित किटुकले म्हणाले की, हा प्रकल्प नोव्हेंबर 2025 ते फेब्रुवारी 2026 पर्यंत कार्यरत राहणार असून सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातील 48 पूरग्रस्तगावांमध्ये मिनिमम इनिशल सर्विस ऑफ पॅकेज अंतर्गत प्रजननक्षम जोडप्याना कुटुंब नियोजन साधणांचे वाटप, सुरक्षित गर्भपात, गरोदर व स्तनदा माता तपासणी, गर्भाशय व स्तानाची कॅन्सर तपासणी, एच.आय. व्ही तपासणी व समुपदेशन, लिंगभेद अन्याय व अत्याचार समुपदेशन व संदर्भ सेवा, वंधत्व निवारण, स्त्री पुरुष लैंगिक आजारावर उपचार, हिमोग्लोबिन, शुगर, व्ही. डी. आर. एल. तपासणी व सर्वसामान्य तपासणी व औषधोपचार आदी सेवा दिल्या जाणार आहेत.*
*डॉ. संतोष नवले आपल्या मनोगतात म्हणाले की, सोलापूर जिल्हापरिषद आरोग्यविभाग व मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष हा प्रकल्प यशस्वी करण्यासाठी तत्पर असेल व फॅमिली प्लँनिंगला शिबिराच्या आयोजनास स्थानिक पातळीवर सर्वतोपरी मदत करणार असल्याचे त्यांनी सांगितले.*
*हा प्रकल्प यशस्वी करण्यासाठी सोलापूर जिल्हापरिषद आरोग्यविभाग, जिल्हा शल्यचिक्त्सिक कार्यालय सोलापूर, मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर, इंडियन रेडक्रॉस सोसायटी शाखा सोलापूर व भारतीय जैन संघटना मिळून कामकारणार आहेत अशी माहिती केतन शहा यांनी दिली. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सोलापूरचे प्रतिनिधी तथा अधिकारी शक्तीसागर ढोले यांनी सॊलापूर जिल्ह्यात उद्भवलेल्या पूर परिस्थितीत त्यांनी बचावकार्यात उल्लेखनीय कार्य केले. अपदामित्र व राज्यातील पहिली अपदामहिलासखी बचाव टीम तयार करून पूरपरस्थितीत अनेकांचे प्राण वाचविण्यात मोलाचे योगदान दिल्याबद्दल मानपत्र, शाल, बुके व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. हा पुरस्कार त्यांच्या वतीने त्यांच्या सहाय्यक अधिकारी अर्चना बिसोई यांनी स्वीकारला तर मानपत्र वाचन रामचंद्र वाघमारे यांनी केले.
या कार्यक्रमास विविध समाजिक संस्थाचे प्रतिनिधी, शासकीय अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत चेअरपर्सन प्रा. डॉ. एन. बी. तेली यांनी केले. प्रास्ताविक शाखाधिकारी सुगतरत्न गायकवाड यांनी केले. सूत्रसंचालन कार्यक्रमअधिकारी वीरेंद्र परदेशी यांनी केले तर आभार प्रा. डॉ. विजया महाजन यांनी मानले.
