Type Here to Get Search Results !

पत्रकार राजरतन डोंगरे यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करणाऱ्या पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांचे निलंबन करा पत्रकार सुरक्षा समितीसह विविध संघटनेच्या वतीने पोलीस उपभागीय अधिकाऱ्यांना निवेदन !



माजलगाव (प्रतिनिधी)

पत्रकार राजरतन डोंगरे यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करणाऱ्या पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांचे निलंबन करून अन्य ठिकाणी बदली करण्यात यावी या व इतर मागण्यांसाठी 

पत्रकार सुरक्षा समिती सह विविध संघटनेच्या वतीने पोलीस उपभागीय अधिकाऱ्यांना दिनांक ९ नोव्हेंबर २०२५ रोजी  निवेदन सादर देण्यात आले आहे मा.मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडवणीस महाराष्ट्र राज्य मुंबई मुख्यमंत्री कार्यालय (मंत्रालय विभाग मुंबई) यांना ई-मेल द्वारे निवेदन पाठविण्यात आले आहे

सविस्तर वृत्त असे की

बीड जिल्ह्यातील माजलगाव शहर पोलीस स्टेशन येथील पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांनी पत्रकार राजरतन डोंगरे यांना अर्वाच्य भाषेत अपमानित करण्यात होते तसेच त्यांना कॅबिनच्या बाहेर काढण्यात आले होते त्यावेळी चा घटनाक्रमाचा सीसी फुटेज व व्हिडिओ हे तपासून त्यांची सखोल चौकशी करुन लोकशाहीचा आधारस्तंभ असलेल्या पत्रकाराला ज्या पद्धतीने अधिकारी वागणूक देत आहे अशा अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात यावे व अन्य ठिकाणी बदली करण्यात यावी.अशी मागणी पत्रकारांच्या वतीने करण्यात आली

माजलगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांनी पत्रकार राजरतन डोंगरे हे मुलाखत घेण्यासाठी शहर पोलीस स्टेशनला गेले असता  माजलगाव तालुक्यातील अवैध धंदे, मटका, गुटखा, वाळू तस्करी, खुलेआम दारूची विक्री, घरफोडी व व्यापारीचे दुकान फोड़ीसह  इतर अवैध धंदे फोपावले असून या संदर्भात त्याची विचारणा करण्यासाठी गेलेले पत्रकार राजरतन डोंगरे (लोक मंच मराठी) (जिल्हा प्रतिनिधी) हे या टीव्ही चॅनेलला मुलाखत घेण्यासाठी विचारणा केली असता त्यांनी यावेळी मुलाखत न देता पी आय राहुल सूर्यतळ यांनी आपल्या वैयक्तिक जीवाशी घेत तू माझ्या कॅबिनला कशामुळे आला व कॅमेरा घेऊन का येतोस?असे बोलून  राहूल सुर्यतळ यांनी राजरतन डोंगरे यांच्याशी आरेरावी करत अर्वाच्य भाषेत त्यांचा अपमान केला असल्याचा आरोप करण्यात आला असून हा सर्व घटनाक्रम माजलगाव शहर पोलिस ठाण्याच्या सीसीटीव्ही मध्ये कैद आहे त्याची पडताळणी करून संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करावी. राजरतन डोंगरे यांना धमकी दिली

(३५३) जुन्या कायद्यानुसार दिली व

भारतीय न्याय संहिता बि एस एन एल नविन कायद्या नुसार सुधारित १३२ गुन्हा दाखल करण्यात येईल याची धमकी दिली असं ही निवेदनात म्हटलं असून तू कुठल्याही अधिकाऱ्यांना अशा प्रकारचे प्रश्न भविष्यात विचारले नाही पाहिजे  त्यामुळे तुला ही एक तंबी माझ्यातर्फे देईल अशी धमकी दिली यामुळे राजरतन डोंगरे यांचे मनोबलाचे खच्चीकरण झाले आहे  त्यामुळे पत्रकार सुरक्षा समिती व विविध संघटनेच्या पदाधिकारी च्या वतीने निवेदन देण्यात आले आहे. या सर्व प्रकाराची सखोल चौकशी करून तात्काळ योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी बीड जिल्ह्यातील व माजलगाव तालुक्यातील सर्व पत्रकारांच्या वतीने मा.मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडवणीस महाराष्ट्र राज्य यांच्याकडे निवेदन ई-मेल द्वारे पाठविण्यात आले आहे त्याच बरोबर महाराष्ट्र विधान परिषद विरुद्ध पक्षनेते अंबादास दानवे  उपमुख्यमंत्री

अजित दादा पवार  तथा पालकमंत्री बीड जिल्हाचे

आमदार प्रकाश दादा सोळंके  पोलीस आयुक्त

पोलीस संभाजी नगर

बीड जिल्हाअधिकारी पोलीस अधीक्षक बीड,

यांना निवेदन ईमेलद्वारे पाठविण्यात आले आहे तसेच पोलीस उपविभागीय अधिकारी माजलगाव यांना देखील   दिनांक ९ /११/२०२५ रोजी निवेदन देण्यात आले आहे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.