फलटण ( विक्रम वाघमारे )
राजे गटाचे कट्टर समर्थक व सोमवार पेठेचे शिल्पकार माजी नगरसेवक ज्येष्ठ नेते सोमाशेठ अण्णा जाधव त्यांचे चिरंजीव विक्रम भैया जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षामध्ये प्रवेश केला. यावेळी फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे फलटण तालुका अध्यक्ष श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर उपस्थित होते. नुकतेच माजी नगरसेवक सनी अहिवळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. तर आज जेष्ठ नेते सोमाशेट जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षामध्ये प्रवेश केल्याने फलटणच्या राजकारणाला नवीन दिशा मिळाली आहे. यावेळी माजी नगरसेवक फिरोज शेख, भीमदेव बुरुंगले, मनोज गायकवाड़ अंकुश (पाटिल) जाधव
सोमाशेट जाधव यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाने सुरू असलेल्या नगरपालिका निवडणूक मध्ये मोठे राजकीय परिवर्तन घडण्याची शक्यता असल्याचे जाणकार सांगतात. सोमाशेट जाधव यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने महायुतीचे प्राबल्य वाढल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.
