सोलापूर (प्रतिनिधी) शहरात वेगवेगळ्या कारणातून धरणे, मोर्चा, आंदोलने केली जातात, याची नोंद पोलिस दरबारी असते. समोरील गर्दी जास्त दिसली की अनेकजण चिथावणीखोर भाषणे करतात. त्यातून पुढे दंगली, भांडणे, तेढ, तणाव निर्माण होतो. या पार्श्वभूमीवर प्रत्येक सभा, मोर्चाच्या ठिकाणी जमलेली गर्दी व सभेतील प्रमुख नेत्यांच्या भाषणांचे व्हिडिओ चित्रणासाठी साध्या वेशातील पोलिस नेमले जात आहेत.
सोलापूर शहरात दरवर्षी सरासरी २०० दिवस जिल्हा परिषदेजवळील पूनम गेटसमोर धरणे, आंदोलने, मोर्चा निघतात. याशिवाय विविध ठिकाणी सभा होतात. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा असतो. त्या ठिकाणी संबंधित पोलिस ठाण्याचा बंदोबस्त असतो. त्यासाठी स्थानिक पोलिसांकडून परवानगी देखील बंधनकारक आहे. संबंधित घटकाने त्यांच्या रास्त मागण्या कायद्याच्या चौकटीत राहून शासनापर्यंत मांडाव्यात, अशी अपेक्षा असते. कायद्याचे
उल्लंघन झाल्यास संबंधितांवर गुन्हे देखील दाखल होतात. याशिवाय सभांमधील भाषणांमधून सामाजिक शांतता
बिघडली तर पोलिस अंमल दारांनी काढलेले व्हिडिओ चित्रीकरण पाहून
त्यानुसार त्यासाठी कारणीभूत सर्वांवर गुन्हे दाखल केले जातात दुसरीकडे कोणाच्या सभेला कोणते लोक येतात किती लोक येतात म्हणजे गर्दी किती होऊ शकते याचाही अंदाज पोलिसांना त्या रेकॉर्डिंगमुळे येतो त्यामुळे गोपनीय विभागातील सभा मोर्चा आंदोलनाच्या ठिकाणाचे चित्रीकरण केले जाते.
सभा मोर्चे धरणे अशा ठिकाणी कोणी चिथावणीखोर भाषण करू नये दोन धर्मात किंवा जातीमध्ये तेढ निर्माण होईल असे भाष्य टाळावे सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे त्या दृष्टीने शहर पोलिसांचे सतत प्रयत्न सुरू असतात त्यासाठी सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमाचे पोलिसांकडून रेकॉर्डिंग केले जाते अशी माहिती सोलापूर गुन्हे विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने यांनी दिली आहे.
