Type Here to Get Search Results !

शहरातील रस्त्यावरील खड्डे त्वरित बुजवा, अन्यथा कामगार सेना आंदोलन करणार. विष्णू कारमपुरी (महाराज )




 सोलापूर (प्रतिनिधी) शहरातील प्रमुख व अंतर्गत रस्त्यावर अतिवृष्टी व इतर कारणामुळे झालेल्या खड्ड्यामुळे शहरवासीयांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे., म्हणून सोलापूर शहरातील प्रमुख व अंतर्गत रस्त्यावरील खड्डे त्वरित बुजवा., अन्यथा कामगार सेना तीव्र आंदोलन करणार असा इशारा वजा निवेदन सोलापूर महानगरपालिका आयुक्तांना महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने देण्यात आले.

         कामगार सेनेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात, सोलापूर शहरात अतिवृष्टी झाल्यामुळे शहरातील प्रमुख रस्त्याच्या अंतर्गत रस्ते देखील खड्डेमय झालेले आहेत. सदर खड्ड्यामुळे वाहनधारकांना वाहन चालविणे धोक्याचे व अपघाताचे झाले आहे. रस्त्यावरील काही खड्डे जास्त खोलपर्यंत झाल्याने वाहनधारकांच्या नजरेस येत नाही. त्यामुळे ताबडतोब ब्रेक दाबल्याने अपघात होतो. अनेक वेळा दुचाकी  वाहनधारक डबल शीट असल्याने विशेष करून महिला असलेल्या वाहनांचा अपघात होऊन अनेक वाहनधारकांच्या अपघाताने अपंगत्व देखील आले आहे. त्याचबरोबर शहरातील रस्त्यावर ड्रेनेजचे झाकण रस्त्यावर एक ते दीड फूट खोलीवर व उंचीवर आहेत ते देखील अपघातास कारणीभूत ठरत आहे. अशा धोकादायक खड्डे व ड्रेनेच्या झाकणामुळे सोलापूर शहरवासी यांचे जीवन धोक्यात आले आहे आणि सोलापूर वासियांना सुरक्षित जीवन देणे हे महानगरपालिकेचे आद्य कर्तव्य आहे याबाबत अनेक सामाजिक संघटना राजकीय पक्ष व इतर लोकांनी महापालिकेस निवेदन देऊनही त्याची दखल घेतली नाही.

        तरी माननीयांनी सोलापूर जिल्ह्याचे महानगरपालिका आयुक्त या नात्याने सोलापूर शहरातील लोकांचे जीव वाचविण्यासाठी व होणारे अपघात रोखण्यासाठी सोलापूर शहरातील प्रमुख व अंतर्गत रस्ते आणि ड्रेनेच्या झाकणाची दुरुस्ती ताबडतोब करावे अन्यथा महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी असे सदर निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

       महापालिका आयुक्त यांना निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात विठ्ठल कुराडकर, प्रसाद जगताप, गुरुनाथ कोळी, पप्पू शेख, अरुण सीडगिद्दी, रेखा अडकी, राधिका मीठ्ठा, स्वाती शिंदे, सविता दासरी, लक्ष्मी रच्चा, अंबव्वा मालपुरी, रामबाई माटेटी, लक्ष्मी गुंटला, पद्मा मॅकल आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.