सोलापूर (प्रतिनिधी ) फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. संपदा मुंडे यांच्या संशयास्पद आत्महत्येप्रकरणी आम्ही आज सोलापूर पोलिस आयुक्तांकडे औपचारिक निवेदन सादर केले.
डॉ. मुंडे यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेल्या पत्रात गंभीर आरोप केले आहेत —पोलीस निरीक्षकाकडून लैंगिक अत्याचार वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून मानसिक व शारीरिक छळ तक्रारींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष राजकीय हस्तक्षेपाद्वारे आरोपींना संरक्षण या सर्व बाबी कायदा-सुव्यवस्थेवरील अत्यंत धोकादायक प्रश्न निर्माण करतात. पीडितेला न्याय मिळण्याऐवजी तिच्याच चरित्रहननाचे प्रयत्न चिंताजनक आहेत.
प्रमुख मागण्या: स्वतंत्र व उच्चस्तरीय चौकशी यंत्रणेद्वारे सखोल तपास
आरोपी अधिकाऱ्यांवर तत्काळ कठोर कारवाई तपासात राजकीय हस्तक्षेप थांबविण्याची हमी महिला अधिकाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी शासकीय यंत्रणेत आवश्यक सुधारणा
एक तरुण महिला डॉक्टर छळामुळे जीव देते… आणि आरोपी सुरक्षित राहतात — हे महाराष्ट्र मान्य करणार नाही!
न्याय मिळेपर्यंत आमचा संघर्ष सुरूच राहील.
असे जिल्हाप्रमुख अजय दासरी यांनी सांगितले यावेळी महिला जिल्हासंघाटिका अमिता जगदाळे,उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण,दत्ता गणेशकर,भारती मुनोली,शशिकांत बिराजदार,रवींद्र नागणकेरी,रवी म्हेत्रे,रामसिंग धनिवाले,अशोक बोकेवाले,सुरेश शिंदे,नाना मोरे,मीनाक्षी जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते.
