Type Here to Get Search Results !

फताटेवाडी येथे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते वृक्षारोपण





सोलापूर (प्रतिनिधी )दिनांक 07 नोव्हेंबर 2025 रोजी एनटीपीसी फटाटेवाडी येथे ५१ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने  पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली एनटीपीसी परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला.


सदर कार्यक्रमांतर्गत परिसरात २०० फळझाडे तसेच २०० दुर्मिळ औषधी वनस्पतींची लागवड करण्यात आली.


या कार्यक्रमास एनटीपीसी चे मुख्य कार्यकारी निवेदक श्री. शास्त्री, एच.आर. मॅनेजर श्री. रेड्डी, इतर अधिकारी व कर्मचारीवर्ग, तसेच वळसंग पोलीस ठाणे येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल डोंगरे, पोलीस उपनिरीक्षक श्री. रविराज कांबळे, आणि पोलीस ठाण्याचा कर्मचारीवर्ग उपस्थित होता


सदर वृक्षारोपण कार्यक्रम अत्यंत उत्साहात व यशस्वीपणे पार पडला. या उपक्रमामुळे परिसरात हरिताई वाढविण्यास हातभार लागणार असून पर्यावरण संवर्धनाचा संदेशही दिला गेला.

“वृक्ष लावा – पर्यावरण वाचा” या संदेशाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.