Type Here to Get Search Results !

प्रकल्प उदघाटन समारंभात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तीसागर ढोले यांचा होणार सन्मान




सोलापूर (प्रतिनिधी ) फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया, सोलापूर शाखा, जिल्हापरिषद सोलापूर आरोग्यविभाग, जिल्हा शल्यचिक्त्सिक कार्यालय सोलापूर, मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर, इंडियन रेडक्रॉस सोसायटी शाखा सोलापूर व भारतीय जैन संघटना यांच्यावतीने सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातील 48 पुरग्रस्त गावांमध्ये आरोग्य तपासणी शिबीरांचे आयोजन करण्यात येणार आहे.


फॅमिली प्लँनिंग असोसिएशन ऑफ इंडिया, सोलापूर शाखेला इंटरनॅशनल प्लॅन्ड पेरेंटहूड फेडरेशन व ऑस्ट्रेलियन एड यांच्याकडून *स्प्रिंट फोर मानवतावादी प्रकल्प मिळाला आहे. पूरग्रस्त गावात मिनिमम इनिशल सर्विस ऑफ पॅकेज अंतर्गत प्रजनन आरोग्याच्या सेवा दिल्या जाणार आहेत.* या प्रकल्पाचे उदघाटन *सोमवार दि. 10 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 12.30 वाजता रामलाल चौकातील हॉटेल निसर्ग एक्झिक्युटिव्ह येथे होणार आहे. या वेळी सॊलापूर जिल्ह्यात उद्भवलेल्या पूर परिस्थितीत बचावकार्यात उल्लेखनीय कार्य केले व अनेकांचे प्राण वाचविण्यात मोलाचे योगदान दिल्याबद्दल जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सोलापूरचे प्रतिनिधी तथा अधिकारी शक्तीसागर ढोले यांचा सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल व बुके देऊन गौरव करण्यात येणार आहे.*


या कार्यक्रमास फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया मुंबई मुख्यालयाचे प्रकल्प व्यवस्थापक डॉ. अमित कीटूकले, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा डोईफोडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मोहन शेगर, मुख्यमंत्री सहाय्यता निधी सोलापूर जिल्हा अध्यक्ष डॉ. अविनाश खांडेकर, अक्कलकोट तालुका आरोग्यधिकारी डॉ. अश्विन करजखेडे, माढा तालुका आरोग्यधिकारी डॉ. आरती पटणे, मोहोळ तालुका आरोग्यधिकारी डॉ. अरुण पाथरूडकर, वैद्यकीय अधीक्षक माढा व मोहोळ ग्रामीण रुग्णालय डॉ. विलास मेमाणे, वैद्यकीय अधीक्षक कुर्डुवाडी ग्रामीण रुग्णालय डॉ. एस. एस. रणदिवे, सोलापूर जिल्हापरिषद माध्यम विस्तार अधिकारी धनंजय वाळा, इंडियन रेडक्रॉस सोसायटी शाखा सोलापूरचे चेअरमन डॉ. राजीव प्रधान, सचिव जयेश पटेल, अक्कलकोट तालुका विस्तार अधिकारी महेश भोरे, एड्स नियंत्रण विभाग जिल्हा कार्यक्रम अधिकारी कृष्णा सकट, भारतीय जैन संघटनेचे राज्य अध्यक्ष केतनभाई शहा, महिला राज्य प्रमुख कांचनमाला संगवे, राज्य कार्यकारणी सदस्य श्याम पाटील, विभागीय उपाध्यक्ष अभिनंदन विभूते, विभागीय महिलाध्यक्ष मायाताई पाटील, जिल्हाध्यक्ष देशभूषण वसाळे आदी उपस्थित राहणार आहेत अशी माहिती सोलापूर शाखेचे मार्गदर्शक प्रा. डॉ. श्रीकांत येळेगावकर, चेअरपर्सन प्रा. डॉ. एन. बी. तेली, व्हाइस चेअरपर्सन आयेशा रंगरेज, फायनान्स ॲडव्हायझर सपना चिट्टे, डॉ. विजया महाजन, डॉ. गौरी कहाते व शाखाधिकारी सुगतरत्न गायकवाड यांनी दिली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.