Type Here to Get Search Results !

देशप्रेमी मुस्लिम बांधवांच्या हाती “मशाल” शिवसेनेच्या विजयाचा निर्धार!




सोलापूर (प्रतिनिधी ) शहर मध्य विधानसभा — प्रभाग २१ परिसरातील सामाजिक कार्यकर्ते इस्माईल मकानदार यांनी आपल्या सहकाऱ्यांसह शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. जिल्हाप्रमुख डॉ. प्रा. अजय दासरी यांच्या संपर्क कार्यालयात आयोजित कार्यक्रमात त्यांना शिवबंधन बांधून पक्षप्रवेश देण्यात आला.


या प्रसंगी शिवसेना पदाधिकारी व परिसरातील देशप्रेमी मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


इस्माईल मकानदार यांच्या प्रवेशामुळे शहर मध्य विधानसभा परिसरात राष्ट्रप्रेमी मुस्लिम समाजात शिवसेनेच्या विचारांना नवे बळ मिळाले आहे. पक्षप्रमुख श्री. उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वावर वाढता विश्वास व्यक्त करत अनेक मुस्लिम बांधव शिवसेनेच्या झेंड्याखाली एकत्र येत आहेत.


या उपक्रमासाठी सातत्याने प्रयत्न करणारे पत्रकार व शिवसैनिक सिकंदर नदाफ यांच्या मेहनतीला यश आले असून, “शहर उत्तर व शहर मध्य”मधील मुस्लिम समाजाला शिवसेनेच्या भूमिकेशी जोडण्याच्या त्यांच्या कार्याचा विशेष उल्लेख करण्यात आला.


जिल्हाप्रमुख डॉ. प्रा. अजय दासरी यांनी सर्वांचे मनःपूर्वक स्वागत करून भविष्यातील संघटनात्मक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी ,अंबादास चव्हाण,सुशील उपलप,महिबूब पठाण,सिकंदर नदाफ, छत्रपती संभाजी महाराज ब्रिगेड चे शामभैय्या कदम उपस्थित होते.



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.