सोलापूर (प्रतिनिधी)- सांगोला तालुक्यातील कोळे येथील वाहिद अल्लाउद्दिन आतार हे पूनम गेट, सोलापूर येथे 15 ऑक्टोबर 2025 पासून आमरण उपोषणास सुरुवात केली. आज गुरुवार आमरण उपोषणाचा दुसरा दिवस आहे.या आमरण उपोषणास सांगोला तालुक्यातील पत्रकार सतीश सावंत व चंद्रकांत ऐवळे यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे.
महुद रोड परिसरातील ग्रीन झोनमधील गट क्र. 460 ते 466 या जमिनींवर बेकायदेशीर प्लॉटिंग आणि मुरुम उत्खनन सुरू असून शासनाचा कोट्यवधी रुपयांचा तोटा झाला आहे, असा गंभीर आरोप अत्तार यांनी केला आहे. या प्रकरणात जबाबदार अधिकारी व संबंधित प्रशासनावर फौजदारी गुन्हे दाखल करून तसेच त्यांच्या संपत्तीची ED व CBI मार्फत चौकशी करावी अशी त्यांची प्रमुख मागणी आहे.“ही लढाई केवळ माझी नाही, ही माणदेशातील पर्यावरण, प्रामाणिक प्रशासन आणि भविष्यातील पिढ्यांसाठीचा हा मोठा संघर्ष आहे. सांगोला तालुक्यातील ग्रीन झोन परीसर वाचवण्यासाठी प्राण पणाला लावला तरी चालेल पण विधिलिखित सत्य बाहेर आणणारच” असा चंग अत्तार यांनी बांधला आहे जनतेत त्यांच्या या आमरण आंदोलनाबद्दल तीव्र सहानुभूती आणि पाठिंबा उमटत असून,जनतेतून प्रशासानाबद्दल आक्रोश देखील दिसून येत आहे प्रशासनाने तात्काळ दखल घ्यावी, अशी सर्वसामान्यांची मागणी उपोषणकर्ते वाहिद अत्तार यांसह जनसामान्यांची मागणी जोर धरून आहे
न्यायासाठी उभा असलेला एक माणूस — आणि संपूर्ण प्रशासकीय व्यवस्था ही मौन अवस्थेत का आहे? असा सवाल युवा पत्रकार वाहिद आतार यांनी प्रशासनास विचारला आहे. उपोषणाची दखल न घेतल्यास लवकरच पाण्याचा देखील त्याग करण्याचा इशारा प्रसार माध्यमांशी बोलताना दिला अत्तार यांनी दिला आहे.
