सोलापूर (प्रतिनिधी)
अलीकडील काही काळात भाविकांना स्वामींची प्रचिती मोठ्या प्रमाणावर येत आहे. त्यामुळे येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरातील स्वामी समर्थ दर्शनाकरिता येणाऱ्या भाविकांची संख्या खूपच वाढलेली आहे. येणाऱ्या भाविकांना सर्वोत्तम स्वामी दर्शन व्यवस्था करणे हे मंदिर समितीचे प्रथम कर्तव्य आहे, ही बाब जाणून घेऊन समितीचे अध्यक्ष महेश इंगळे यांनी स्वतः आध्यात्मिक जीवनशैली आत्मसात करून स्वामी सेवेत आपले जीवन अर्पण केले आहे. भक्तांच्या गर्दीमध्ये मंदिरात ते स्वतः पुढाकाराने उभे राहून सर्व स्वामी भक्तांना सुलभ दर्शन कसे घेता येईल याचे नेटाने नियोजन करीत असतात यानिमीत्ताने वटवृक्ष मंदिर समितीच्या या नियोजनाने सर्व भाविकांना सुलभ स्वामी दर्शन लाभून समाधान लाभते त्यामुळे वटवृक्ष मंदिर समितीच्या कार्य पद्धतीने भाविकांचे मनोभावे स्वामी दर्शनाने समाधान होत असल्याचे मनोगत सिव्हील सर्जन
(जिल्हा शल्यचिकीत्सक) डॉ.वर्षा डोईफोडे
यांनी व्यक्त केले त्यांनी अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. या प्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी डॉ.वर्षा डोईफोडे यांचा
श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला. या प्रसंगी
डॉ.वर्षा डोईफोडे बोलत होत्या यावेळी अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. अशोक राठोड, डॉ.बाबासाहेब सुलतानपुरे, डॉ.निरज जाधव, मेट्रन विजयमाला बेले, डॉ.निखील क्षीरसागर, डॉ.गुरुशांत चिंचोळकर, डॉ.सुरेश दुधगी, श्रीशैल गवंडी, सागर गोंडाळ, प्रसाद सोनार, स्वामीनाथ लोणारी, श्रीकांत मलवे, वैभव जाधव, चंद्रकांत कवटगी आदींसह भाविक भक्त उपस्थित होते.
