सोलापूर (प्रतिनिधी ) दिवाळीनिमित्ताने खरेदीसाठी अनेकांच्या घरात दागिने, रोकड मोठ्या प्रमाणावर असते. सणासुदीत - चोरी, दरोड्याच्या घटना होत असतात. या पार्श्वभूमीवर शहरातील प्रत्येक रस्त्यावर रात्री १२ ते पहाटे ५ वाजेपर्यंत विशेष नाकाबंदी लावण्याचा निर्णय पोलिस आयुक्तांनी घेतला आहे
सोलापूर शहरात विजापूर नाका एमआयडीसी जेलरोड जोडभावी पेठ फौंजदार चावडी सदर बझार अन सलगर वस्ती अशी 7 पोलीस ठाणे आहेत या पोलीस ठाण्याअंतर्गत प्रत्येकी एक विशेष पथक तयार करण्यात आले आहे या पथकाने दररोज त्यांच्या हद्दीतील मुख्य रस्त्यावर नाकाबंदी लावायची आहे बॅर्रीकेटिंग लावून हे पथक त्या रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्या प्रत्येक वाहनाची तपासणी करेल.
कायदा किंवा वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे या शिवाय गुन्हे देखील दाखल केली जातील असा इशारा पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी दिला आहे दोन दिवसापूर्वी विजापूर नाका पोलीसांच्या हद्दीत सोरेगाव -डोणगाव क्रॉस रोडवर नाकाबंदी लावली होती त्यावेळी एका कारची झडती घेतल्यावर त्यात धारदार तलवार आढळून आली. त्या कारचालकावर गुन्हा दाखल केल्याचीही माहिती पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी दिली आहे.
