Type Here to Get Search Results !

बशीरुज्जमा सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या पारितोषिक वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला अनेक मान्यवरांची लाभली उपस्थिती.




प्रतिनिधी (सोलापूर) 

दिनांक 31 ऑगस्ट 2025 रोजी साप्ताहिक मित्रप्रेम वर्धापन दिनानिमित्त, बशीरुज्जमा सामाजिक बहुउद्देशीय संस्था (महा- राज्य) तर्फे आयोजित वैद्यकीय, शैक्षणिक, वकील, फार्मासिस्ट या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून समाजात सकारात्मक बदल घडविल्याबद्दल त्यांच्या या अतुलनीय सेवेसाठी त्यांना 'राज्यस्तरीय सेवारत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. हा सोहळा अतिशय दिमाखदार व उत्साही वातावरणात संपन्न झाला झाला. कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी कांग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष सुधीरजी खरटमल साहेब होते. यावेळी माजी महापौर आरिफ शेख, सोलापूर विद्यापीठ ऍड. जावेद खैरदी, शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल बापू शिंदे, डॉ.विजय कानेटकर,डॉ.प्रदीप सिंघल, संपादक सलाउद्दीन शेख, छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे शहराध्यक्ष हाजी मतीन बागवान, जिल्हाध्यक्ष शफिक रचभरे, मुख्याध्यापक अब्दुल करीम रचभरे, साजिद शाहभाई, मुख्याध्यापिका सौ. बिस्मिल्ला कलबुर्गी, सौ.आर. बी. नारायणकर, शहर मध्य अध्यक्ष जावेदभाई शिकलकर, राजू भाई हुंडेकरी, मुनाफ शेख, राष्ट्रवादी काँग्रेस युवा अध्यक्ष सरफराज शेख, सोलापूर सांस्कृतिक सेल अध्यक्ष राकेश सोनी, इत्यादी मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रमास अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली होती

 .यावेळी अनेकांना आकर्षक सन्मानचिन्ह व सुंदर प्रमाण पत्र देऊन गौरविण्यात आले. शेवटी साप्ताहिक मित्रप्रेम के कार्यकारी संपादक व बशीरुज्जमा सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष शेख रिजवान सर, यांनी सर्वांच्या मनापासून अभिनंदन केले व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.