सोलापूर (प्रतिनिधी) मुळेगाव तांडा परिसरातील
स्वामी विवेकानंद नगरातील बनावट देशी-विदेशी मद्य तयार करणाऱ्या कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या (एक्साईज) पथकाने घाड टाकली. त्याठिकाणी देशी-विदेशी दारूच्या तब्बल दहा हजार २८ बाटल्या सापडल्या. याशिवाय विविध कंपन्यांचे लेबल, बुचणे देखील आढळली. या पथकाने कारवाईत एकूण १२ लाख ७० हजार ३२० रुपयांचा मद्यसाठा जप्त केला आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या त्या पथकाला खबऱ्याकडून कारखान्यात मोठा मद्यसाठा असल्याची
खबर मिळाली होती. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक ए. व्ही. घाटगे यांच्या नेतृत्वातील पथकाने ही कारवाई केली. धाड टाकली त्यावेळी बनावट पद्धतीने मद्य बाटल्यांमध्ये भरून
त्याला विविध कंपन्यांचे लेबल व बुच लावले जात होते. या गुन्ह्यातील संशयित आरोपी शिशूपल धनू राठोड फरार झाल असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल आहे.
ऑगस्ट मध्ये 51 लाखाची
दारू जप्त
1ऑगस्ट ते 31 ऑगस्ट या काळात राज्य उत्पादन शुल्क विभागाने हातभट्टीवर धाडी टाकून अवैधरित्या सोलापूर जिल्ह्यातून वाहतूक करणाऱ्यावर ही कारवाई केली या कारवाईत 60 हजार 660 लिटर गूळमिश्रित रसायन पाच हजार 880 लिटर हातभट्टी 560 लिटर देशी -विदेशी दारू दोन हजार लिटर बिअर व 12 वाहनासह एकूण 50 लाख 81 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता
सदरची कारवाई निरीक्षक घाटगे आर एम चवरे तसेच दुय्यम निरीक्षक समाधान शेळके सुखदेव सिद शिवकुमार कांबळे धनाजी पोवार सचिन शिंदे रमेश कोलते राम निंबाळकर अंजली सरवदे सहाय्यक दुय्यम निरीक्षक मुकेश चव्हाण संजय चव्हाण जवान तानाजी जाधव कपिल स्वामी नंदकुमार वेळापुरे चेतन व्हंनगुंटी अनिल पांढरे विनायक काळे पवन उगले अण्णासाहेब फड वसंत राठोड तसेच महिला जवान शिवानी मुंडे वाहन चालक दीपक वाघमारे सानप दीपाली सलगर यांनी पार पाडली असून सदर गुन्ह्याचा तपास समाधान शेळके करीत आहेत
0 Comments