Type Here to Get Search Results !

सोलापुरात डीजे बंदीचा वाद पेटला मानाचा आजोबा गणपतीसमोरील लाईट डेकोरेशन केले बंद. सार्वजनिक मध्यवर्ती श्रीगणेशोत्सव मंडळ आक्रमक

 



सोलापुर (प्रतिनिधी)  डीजे बंदीविरोधात सोलापुरकर एकवटले असुन अनेक प्रकारचे आंदोलन सोलापुरात होत आहेत.

 डीजे बंदीमुळे प्रशासनाचा दबाव वाढत असल्याने सोलापुरातील सांऊड लाईट असोसिएशनने आज अनोखी शक्कल लढवत सोलापुरातील राजकीय सामाजिक क्षेत्रातील लोकांना आपली सेवा देणार नसल्याची शपथच घेतली.

 डीजे असोसिएशनने इतकंच न करता सोलापुरातील मानाचा आजोबा गणपतीसमोरील लाईट डेकोरेशन बंद केल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

तात्काळ जेलरोड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक 

शिवाजी राऊत यांनी परिस्थिती हाताळल्याने पुढचा अनर्थ टळला.

सार्वजनिक मध्यवर्ती श्रीगणेशोत्सव मंडळाचे उत्सव अध्यक्ष सोमनाथ मेंडके यांनी डीजे असोसिएशनच्या लोकांना गणेशभक्तांच्या भावना दुखावु नका अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा प्रसिध्दीमाध्यमांसमोर दिला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.