मराठा आरक्षणाकरिता सोलापूरकर मुंबईला रवाना मोटरसायकल कार जीप टेम्पो ट्रक ट्रॅक्टर पाण्याचा टँकर ॲम्बुलन्स अशा वाहनांचा समावेश



सोलापूर (प्रतिनिधी) विनोद भोसले विलास लोकरे गणेश डोंगरे यांची टीम आझाद मैदानावर गुरुवारी सकाळी पोहोचली : 

माऊली पवार यांच्यासह सकल मराठा समाज डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून निघाला : 

अमोल शिंदे यांचा ग्रुप छत्रपती शिवाजी महाराज चौकातून रवाना : सर्वांनी केले छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन

घरात बसला, तो मराठा कसला...l

कोण म्हणतंय देत नाय....घेतल्याशिवाय येत नाय...l

आता कुठे जायचं ...मुंबईला जायचं अशा घोषणां.

भर पावसात मावळ्यांची मुंबईकडे आगेकूच


मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आझाद मैदान मुंबई येथील मराठा आरक्षण आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातूनच नव्हे तर परराज्यातूनही मराठा समाज मुंबईच्या दिशेने रवाना होत आहे या आंदोलनात सहभागी होण्यासाठी गेल्या दोन दिवसापासून मराठा बांधव एकत्र येत मुंबईला जात आहेत तर काल गुरुवारी सकल मराठा समाजाच्या वतीने माऊली पवार व अमोल शिंदे यांच्या बरोबरीने लाखो समाज बांधव सकाळी दहा वाजता मुंबईला रवाना झाले.

मराठा आरक्षणाकरिता २९ ऑगस्ट रोजी मुंबई मधील आझाद मैदानावरती मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे आंदोलन करणार आहेत सदरचे आंदोलन हे मराठा आरक्षणाकरिता असलेले शेवटचे आंदोलन होणार आहे या आंदोलनात सर्व महाराष्ट्रातील मराठ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहनही जरांगे पाटील यांनी केले होते त्या आंदोलनास प्रतिसाद देत सोलापूर मधूनही लाखो मराठा बांधव रवाना झाले आहेत. सरकार जोपर्यंत आंदोलनाचा निर्णय जाहीर करत नाही. ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण जाहीर करणे, सग्या सोयऱ्यांचा नियमाची अंमलबजावणी करणे, अशा विविध मागण्याकरिता हे आंदोलन सुरू असणार आहे 

आरक्षणाचा निर्णय झाल्याशिवाय कोणीही माघारी फिरणार नाही अशा प्रतिज्ञा करूनच समाज बांधवांनी घर सोडले आहे.

जुळे सोलापूर, मोदीसह शहरातील मराठे होम मैदानाजवळ एक आले शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास प्रथम अभिवादन करण्यात आले. त्यानंतर चार हुतात्मा, राजमाता अहिल्यादेवी होळकर, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपाती संभाजी महाराज या महापुरुषांना अभिवादन करून सर्व समाज बांधव मुंबईच्या दिशेने गेले आहेत. यामध्ये राजन जाधव, पुरूषत्तोम बरडे, चंद्रकांत वानकर, नाना काळे, राजन जाधव, दत्ता मुळे, प्रा. गणेश देशमुुख, सचिन साळूंखे, महादेव गवळी, बापू चराटे महेश चव्हाण, सुुनिल शेळके यांच्यासह मराठा बांधव मुंबईकडे गेले आहेत.


सोलापूरचे एक टीम गुरुवारीच आझाद मैदानावर पोहोचले

सीए विनोद भोसले ,गणेश डोंगरे, विलास लोकरे,विठ्ठल शिंदे, शाहू सलगर, संकेत माने, रुपेश गायकवाड यांच्या सह शेकडो मराठा बांधव बुधवारी रात्री सिद्धेश्वर एक्सप्रेस ने मुंबईला रवाना झाले होते ते गुरुवारी सकाळी आझाद मैदानावर पोहोचले आहेत.

        एक मराठा लाख 

         मराठा च्या घोषणा

=================

 घरात बसला .... तो मराठा कसला? कोण म्हणतय देत नाय..आरक्षण घेतल्याशिवाय माघारी येत नाय , आता कुठे जायचं मुंबईला जायचं.. एक मराठा, लाख मराठा अशा विविध घोषणा देत सोलापूर शहर व जिल्ह्यातील मराठा बांधव मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत.

 मोर्चात निघणाऱ्या वाहनाकरिता स्टिकर आणि भगव्या टोप्या आणि टावेल यांची वाटप सकल मराठा समाजाच्या वतीने माऊली पवार यांनी केले आहे. 

===============

       मुस्लिम बिग्रेडचा 

        आंदोलनात सहभाग 

=================

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी छत्रपती शिवाजी मुस्लीम बिग्रेडने जाहीर पाठिंबा दिला आहे. मराठा समाजाबांधवा बरोबर मतिन बागवान, रफिक रसबुरे, सोहेब चौधरी, राजू हुंडेकरी सह मुस्लीम बिग्रेेडचे पदाधिकारी आंदोलनासाठी रवाना झाले आहे.

Post a Comment

0 Comments