सोलापूर (प्रतिनिधी ) सोलापूर येथील जेष्ठ पत्रकार तथा दैनिक
'जय हो' चे संपादक विजयकुमार उघडे यांच्यावर गुरवार दिनांक २६ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ९ ते १० वाजण्याच्या दरम्यान घरी जात असताना बातमी लावण्यावरून चार ते पाच जणांनी मिळून त्यांच्या मोटारसायकला धडक देऊन मारहाण केल्याची गंभीर घटना घडली. आहे या हल्ल्यात जेष्ठ पत्रकार विजयकुमार उघडे जखमी झाले आहेत बातमी लावण्यावरून पत्रकारांना धमकी देणे मारहाण करणे ही बाब अतिशय गंभीर असून हा हल्ला केवळ पत्रकारावर नसून पत्रकारितेच्या चौथ्या स्तंभावर झालेला असल्याची भावना पत्रकार सुरक्षा समिती ने व्यक्त केली असून अश्या भ्याड हल्याचा पत्रकार सुरक्षा समिती तीव्र निषेध व्यक्त करत कडक कारवाईची मागणी केली आहे अश्या घटनामुळे
पत्रकारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. जेष्ठ पत्रकार विजयकुमार उघडे हे निरपेक्ष निर्भीड पत्रकार असून गेली आहे अनेक वर्षांपासून ते दैनिक जयहो वृत्तपत्र चालवतात त्यांनी आपल्या वृत्तपत्रातून सोलापूर शहर जिल्ह्यातील अनेक प्रश्न सडेतोडपणे.मांडून अनेक गंभीर विषयांना वाचा फोडली आहे अश्या जेष्ठ पत्रकारांना मारहाण होणे ही बाब
अतिशय गंभीर अन चिंतादायक असून मारहाण करणारी व्यक्ती कितीही मोठी असली तरी त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे या संदर्भात पत्रकार सुरक्षा समितीने आक्रमक भूमिका घेतली असून जेष्ठ पत्रकार विजयकुमार उगडे यांना मारहाण करणाऱ्या व्यक्तीना तात्काळ अटक करून कायदेशीर कारवाई करण्याबाबत सोलापूर चे पोलीस आयुक्त एम राजकुमार या यांची भेट घेऊन निवेदन सादर करणार असल्याची माहिती पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांनी दिली आहे.

