Type Here to Get Search Results !

मालक, कर्मचार्‍यांचे आर्थिक व्यवहार तपासून योग्य ती कायदेशीर कारवाई करा संस्थापक विष्णु कारमपुरी (महाराज) यांची मागणी

 



 सोलापूर (प्रतिनिधी ) सायबर गुन्हे निर्मुलन संघर्ष समितीच्या वतीने सायबर गुन्ह्यात होत असलेल्या वाढ संदर्भात राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष व सायबर गुन्हा पिढीत प्रसाद जगताप यांनी एक दिवसीय लाक्षणीय उपोषणाची सुरुवात केली. यावेळी माध्यमांशी बोलतांना विष्णु कारमपुरी (महाराज) यांनी ही मागणी केली. सध्या डिजीटल युग असल्याने दिवसेंदिवस तंत्रज्ञान प्रगत होत चालले आहे. जस जसे तंत्रज्ञान प्रगत होत आहे तस तसे गुन्हेगारीचे नवनवीन प्रकरणे उघडकीस येऊ लागले आहे. गुन्हे शाखेने वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतेच फोन पे, गुगल पे चे साऊंड विक्री द्वारे आर्थिक फसवणूक करणार्‍यास जेरबंद करण्यात आले. या लाक्षणिक उपोषणा मध्ये राज्य सरकारला विविध सायबर गुन्हे संबंधित पोलीस यंत्रणा सक्षम करणे. त्यांना नवीन तंत्रज्ञानाचे ज्ञान देणे, शिवाय ऑनलाईन आर्थिक फसवणूकी करणार्‍या जाहिरातींवर ताबडतोब बंदी घालणे. केंद्र सरकारने बंदी घालेले व्ही. डी. ओ. गेम्स, अ‍ॅप्स वर जिल्हास्तरावर बंदी घालणे. ऑनलाईन मटका, गेमींग अ‍ॅप, गेम झोन, व्ही. डी. ओ. पार्लर येथील सुरु असलेल्या बेकायदेशीर आर्थिक व्यवहार तपासणे. या व्हीडीओ गेम पार्लरच्या व्यवसायीक, चालक, मालक, कर्मचार्‍यांचे आर्थिक व्यवहार तपासून त्यांच्यावर योग्यती कायदेशीर कारवाई करणे असे प्रमुख मागण्या या वेळी करण्यात आल्या. विशेष म्हणजे यावेळी व्यक्तीगत माहिती संकलन करणारे अवैध व्यवसायीकांवर ताबडतोब कारवाई केल्यास सायबर गुन्हे काही प्रमाणात अटोक्यात येईल असेही सुचविण्यात आले आहे. जनतेतून सायबर क्राईम संदर्भात जनजागृती करावी असे ही मत व्यक्त करण्यात आले. 

 यावेळी उपोषणकर्ते प्रसाद जगताप सह विष्णु कारमपुरी (महाराज) डॉ. अन्वर होटगीकर, कबीर तांडुरे. रेवण बुक्कानुरे, विश्वजित चौगुले, विठ्ठल कुर्‍हाडकर, गुरुनाथ कोळी, यशवंत पवार, श्रीनिवास बोगा,आदी मान्यवरांनी या उपोषणांत सहभाग नोंदविला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.