सोलापूर (प्रतिनिधी ) पार्क चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापासून आंदोलन गेट कडे येत असताना श्री सिद्धरामेश्वर मंदिर शाहजहूरवली दर्गा सिद्धेश्वर प्रशाला तसेच स्टेट बँक ऑफ इंडिया ब्रह्मदेव माने दादा सहकारी बँक व पुनम गेट तसेच टायपिंग करणारे अनेक दुकाने आहेत या भागात नेहमीच आंदोलन उपोषण मोर्चा निदर्शने होत असल्याने या परिसरात नेहमीच गर्दी आणि वर्दळ असल्याने वाहतुकीची कोंडी निर्माण होते त्याच बरोबर जिल्हा परिषद व इतर शासकीय कार्यालयात जाताना - येताना सर्वसामान्य नागरिकांना व अधिकारी कर्मचाऱ्यांना विविध अडचणीचा सामना करावा लागत आहे महिला व नागरिकांना या भागातील गर्दीतून वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे या भागात बँका असल्यामुळे पैसे भरण्यासाठी व काढण्यासाठी अनेक नागरिक व महिला तसेच पेन्शन धारक वारंवार येत असतात त्यांना देखील येथील गर्दीतून रस्ता काढावा लागत आहे या परिसरात
बरीच गर्दी असल्याने छोटे-मोठे अपघात नेहमीच होत असतात पार्क चौक ते जिल्हा परिषद (पूनम गेट ) हा परिसर एकेरी वाहतूक केल्यास त्या भागातील वर्दळ गर्दी तसेच वाहतुकीची कोंडी होणार नाही तसेच सभा मोर्चा आंदोलन निदर्शने करणाऱ्या व्यक्तीना वाहतुकीचा त्रास होणार नाही त्याच बरोबर जिल्हा परिषद व इतर कार्यालयात जाणाऱ्या अधिकारी कर्मचारी तसेच नागरिकांना या भागातून जाताना येताना अडचण निर्माण होणार सामना नाही या बाबत पोलीस मित्र सोशल फौंडेशन वतीने सोलापूर महानगर पालिका आयुक्त यांना निवेदन सादर केले होते परंतु अद्याप एकेरी वाहतूक बाबत योग्य तो निर्णय झालेला नाही
पार्कचौक ते आंदोलन गेट हा रस्ता एकेरी वाहतूक करणे बाबत पोलीस मित्र सोशल फौंडेशन लवकरच सोलापूर चे पोलीस आयुक्त एम राजकुमार यांची भेट घेऊन रीतसर निवेदन सादर करणार असल्याची माहिती जिल्हा अध्यक्ष राजू वग्गू यांनी दिली आहे.
