सोलापूर (प्रतिनिधी )
पुणे येथील खुनाच्या गुन्ह्यांतील आरोपींची धिंड काढून त्यांना मारहाण करणे आणि खुनाच्या गुन्ह्यातील अल्पवयीन मुलांना पोलिस व्हॅनच्या बोनेटवर बसवून फिरवल्या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यातील तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षकांसह १३ पोलिसांवर दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. राज्य मानवी हक्क आयोगाच्या आदेशाने 'सीआयडी'ने कारवाई केली असून, यात अॅट्रॉसिटी कायद्याचाही समावेश आहे.
तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक मानसिंग पाटील, उपनिरीक्षक आण्णा मधुकर दराडे, नीलेश राजेंद्र मोकाशी, फकीर, हवालदार सुनील हनवते, अंमलदार सागर चंद्रकांत बोरगे, सोहम कैलास शेंडकर, राहुल अशोक ओंधकर मितेश दत्तात्रेय चोरमोले, रवींद्र शंकर गायकवाड, संदीप लक्ष्मण आगळे, अंमलदार सुतार व पवार अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. ही घटना भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एसआरए कॉलनी परिसरात पाच ते नऊ जुलै दरम्यान घडली होती. गुन्हे अन्वेषण विभागाचे (सीआयडी) पोलिस उपअधीक्षक संकेत सतीश गोसावी यांनी याबाबत फिर्याद दिली. रहाणीच्या गुन्ह्यातील आरोपी पाच जुलैला दुपारी शरण आले होते. यातील आरोपीचा आयोगाने नोंदविलेल्या जबाबाप्रमाणे मानसिंग पाटील व इतर पोलिस अधिकारी, अंमलदार यांनी पट्टाने हाता-पायावर मारहाण केली. त्यांना एसआरए कॉलनीत नेत चित्रीकरण केले होते. या घटनेमुळे पोलीस दलात मोठया प्रमाणात खळबळ उडाली असून गंभीर गुन्हे दाखल झाल्याने महाराष्ट्र राज्यातील पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचे मनोबल खचले असून पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याच बरोबर असुरक्षिततेची भावना देखील वाढू लागली आहे
आरोपीची धिंड काढल्या प्रकरणी थेट पोलीस अधिकारी/ कर्मचाऱ्यांवर गंभीर गुन्हे दाखल झाल्याने थेट तपास यंत्रणावर गंभीर परिणाम झाल्याचे दिसत आहे. याबाबत पोलीस मित्र फौंडेशन वतीने सोलापूर चे जिल्हाधिकारी तसेच पोलीस आयुक्त यांना निवेदन सादर करून पोलीस मित्र सोशल फौंडेशन च्या भावना राज्यसरकारकडे कळवण्या बाबत विनंती केली होती
पुणे येथील खून प्रकरणी अल्पवयीन मुलांना गाडीच्या बोनेटवर बसवून धिंड काढल्या प्रकरणी पोलीस अधिकारी /कर्मचाऱ्यांवर दाखल केलेले गुन्हे पाठीमागे घेणे बाबत पोलीस मित्र सोशल फौंडेशन ने एल्गार पुकारला असून सोलापूर येथे राज्य सरकार चे लक्ष वेधण्या साठी जिल्हाधिकारी कार्यालय समोर आंदोलन केले आहे
यावेळी संस्थापक यशवंत पवार जिल्हा अध्यक्ष राजू वग्गू उपाध्यक्ष लक्ष्मण सुरवसे संघटक कलीम शेख शहर संघटक अतुल भडंगे सादिक शेख विनायक जालनापुरे अरुण सिडगिद्दी दत्तात्रय बनसोडे प्रवीण राठोड महादेव शेवाळे वजीर मुलाणी विष्णू सकट अक्षय देवकुळे वैभव जाधव संदीप धोत्रे शहाजी शिंदे शुक्राचार्य शेंडेकर आन्सर तांबोळी इत्यादी पदाधिकारी व सदस्य मोठया संख्येने उपस्थित होते.
*आता थेट आझाद मैदानात आंदोलन*
धिंड प्रकरणी पुणे पोलीस अधिकारी /कर्मचाऱ्यांवर राज्य मानवी हक्क यांच्या आदेशाने सीआयडी ने दाखल केलेल्या गुन्हे बाबत पोलीस मित्र सोशल फौंडेशन ने आक्रमक भूमिका घेतली असून कोणत्याही परिस्थितीत पोलीस दलाच्या मनोबलाचे खच्चीकरण होऊ देणार नाही त्या पोलीस अधिकारी /कर्मचाऱ्यांच्या पाठीशी पोलीस मित्र सोशल फौंडेशन उभे असून राज्यसरकारने तात्काळ पोलीस अधिकारी /कर्मचाऱ्यांवरील गुन्हे पाठीमागे घ्यावे अन्यथा आझाद मैदान मुंबई येथे आंदोलन करण्याचा इशारा संस्थापक यशवंत पवार यांनी यावेळी दिला आहे.

