सोलापूर (प्रतिनिधी ) रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल झालेल्या महिलेच्या विनयभंगप्रकरणी संशयिताला न्यायालयीन कोठडी मिळाली आहे.
फिनेल प्राशन केलेली विजयपूर येथील महिला उपचारासाठी हैदराबाद रोडवरील हव्यशोधरामास्पिटलमध्ये दाखल झाली होती. अतिदक्षता विभागात (आयसीयू) उपचार सुरू असताना रुग्णालयातील सफाई कर्मचाऱ्याने तिचा विनयभंग केल्याचा प्रकार घडला होता. पोलिसांनी पीडितेकडे सविस्तर विचारणा केली. तिच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिसांनी विशाल शिवाजी कांबळे (रा. सोलापूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यानंतर मोबाईल बंद करून तो पसार झाला होता. गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख पोलिस उपनिरीक्षक अल्फाज शेख यांच्या नेतृत्वाखालील पथकाने त्याचा शोध घेतला. एमआयडीसी परिसरातील नातेवाइकाकडे तो लपून बसला होता. पोलिसांनी दुपारी १२ वाजता त्याला अटक करून न्यायालयात हजर केले. सुनावणीनंतर न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्याचा गुन्हेप्रकटी पथक प्रमुख पदभार घेतल्यपासून अनेक प्रलंबीत व गुंतागुंतीचे गुन्हे जलदगतीने उघडकीस येत असून अनेक फरार गुन्हेगारांना पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख यांनी कायद्याच्या चौकटीत आणून जेलवारी करण्यास भाग पाडले आहे एकंदरीत अल्फाज शेख यांच्या अचूक व भेदक नजरेतून गुन्हेगार सुटू शकत नाही हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे
या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक नागेश येळे करित आहेत
