सोलापूर (प्रतिनिधी ) लग्न जुळवण्याच्या बहाण्याने फसवणूक करणाऱ्या एका आंतरजिल्हा बोगस मॅट्रिमोनी रॅकेटचा विजापूर नाका पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पुणे, जालना आणि सोलापूर जिल्ह्यातून पोलिसांनी या गुन्ह्यातील ६ जणांना अटक केली असून, त्यांच्याकडून गुन्ह्याशी संबंधित मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
अशी केली फसवणूक
दिनांक १८ ऑगस्ट २०२६ ते ३१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत आरोपींनी कट रचून फिर्यादी सुरज संजय पवार (वय ३१, रा. गुरुदत्त नगर, सैलफुल, विजापूर रोड, सोलापूर) यांना विवाहात अडकवण्याचे आश्वासन दिले. एजंट ज्योती धनंजय लोंढे, सचिन शिंदे, योगिता दत्तात्रय सूर्यवंशी, सुनिता सुनिल दाभाडे, दत्तात्रय सूर्यवंशी आणि कैलास शिंदे यांनी फिर्यादीकडून विविध कारणांसाठी वेळोवेळी एजंट फी म्हणून २,१७,५०० रुपये उकळले.
यानंतर योगिता हिचा विवाह फिर्यादीशी लावून देण्यात आला. विवाहानंतर योगिता फिर्यादीच्या घरी राहण्यास आल्यावर तिने वेगवेगळ्या अटी व कारणे सांगून घरातून लांब राहणे पसंद केले आणि फिर्यादीच्या घरातील रोख रक्कम तसेच दागिन्यांची माहिती मिळवली. त्यानंतर ती फिर्यादीच्या आईचे दीड तोळ्यांचे सोन्याचे दागिने व घरातील १,००,००० रुपये रोख घेऊन पसार झाली.
पोलिसांची कारवाई आणि ४ पथके
या प्रकरणी फिर्यादी सुरज पवार यांच्या तक्रारीवरून विजापूर नाका पोलीस ठाण्यात गु.र.नं. ५४८/२०२६ नुसार बीएनएस कलम ३१८(२), ३१८(४), ३१६(२), ६१(२)(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतर विजापूर नाका पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संतोष काजळे व तपास पथकाने तांत्रिक विश्लेनाच्या आधारे अत्यंत वेगाने तपास चक्रे हलवली. पोलिसांनी एकूण ४ वेगवेगळी पथके तयार करून पुणे, जालना आणि सोलापूर या तीन जिल्ह्यांमधून आरोपींना ताब्यात घेतले.
सदरची ही यशस्वी कारवाई सोलापूर शहरचे पोलीस आयुक्त एम. राजकुमर, पोलीस उपआयुक्त (परिमंडळ) प्रितम यावलकर, सहायक पोलीस आयुक्त (विभाग-२) श्रीमती विजयालक्ष्मी कुरी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली विजापूर नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण, पोनि (गुन्हे) सुशांत वराळे यांच्या सूचनेनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक शितलकुमार गायकवाड, तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संतोष काजळे, सफौ आप्पा पवार, मपोहेकॉ रश्मी जाधव, पोहेकॉ गणेश शिर्के, पोकॉ सनी राठोड, श्रीरंग काशीद, रमेश कोरसेगांव, राजू पवार, संतोष चानकोटी आणि मपोकॉ स्वाती भोसले यांच्या पथकाने पार पाडली आहे.
या आंतरजिल्हा रॅकेटचे जाळे इतरत्र कुठे पसरले आहे का आणि आरोपींचा इतर गुन्ह्यांमध्ये सहभाग आहे का, याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.सोलापूर शहरात गाजलेल्या या गुंतागुंतीच्या प्रकरणाचा तपास वरिष्ठ अधिकारी निरीक्षक सुहास चव्हाण यांच्या नेतृत्वात अतिशय वेगाने व जलदगतीने तपासाची सूत्रे फिरवत विजापूर नाका पोलीसांनी मोठे रॅकेट उगडकीस आणून कानून क्या चीज हें दाखवून दिले असून अश्या बड्या गुन्ह्यांचा केवळ पर्दाफाश नव्हे तर संपूर्ण रॅकेट उध्वस्त केले आहे या धडाकेबाज कारवाईमुळे अश्या घटनेला चाफ बसणार आहे.
कणखर खमके अन दमदार वरिष्ठ
पोलीस निरीक्षक
सुहास चव्हाण
यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्याचा पदभार घेतल्या पासून
अनेक बडे गुन्हे उघडकीस आणण्यात विजापूर नाका पोलीसांना यशप्राप्त झाले आहे..
विजापूर नाका
पोलीस ठाण्याला कणखर खंबीर अन खमका दमदार अधिकारी लाभल्याने पोलीसांचे देखील मनोबल वाढले आहे.
