Type Here to Get Search Results !

दबंग सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर यांचा वाढदिवसानिमित्त पोलीस मित्र सोशल फौंडेशन वतीने सत्कार.

 



सोलापूर (प्रतिनिधी ) सोलापूर शहर गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर यांचा वाढदिवसानिमित्त पोलीस मित्र सोशल फौंडेशन वतीने शाल  व पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला 

सोलापूर शहरातील चोरी जबरीचोरी घरफोडी सारखे गंभीर गुन्हे उत्तम नेटवर्क दांडगा जनसंपर्क पोलीस खात्यातील अनुभव व तपासाची चक्रे वेगाने फिरवून अनेक गुंतागुंतीचे गंभीर गुन्हे उघडकीस आणण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर यांना यश आले असून  अनेक गुन्हेगारांना  अटक करून न्यायालयाच्या पिंजऱ्यात उभं केलं असून गुन्हेगारी मोडीत काढण्याचा प्रयत्न केला आहे त्यांच्या दबंग व धाडसी कामगिरी  चे पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी वेळोवेळी कौतुक करून शुभेच्छा दिल्या आहेत त्याच बरोबर त्यांना पोलीस दला कढून उत्कृष्ट कामगिरी बाबत अनेक रिवार्ड मिळाले आहेत.

या प्रसंगी पोलीस मित्र सोशल फौंडेशन चे संस्थापक यशवंत पवार जिल्हा अध्यक्ष राजू वग्गू उपाध्यक्ष लक्ष्मण सुरवसे सोलापूर शहर उपाध्यक्ष रमेश दग्गारी सचिव गणेश निंबाळकर विष्णू सकट अरुण सिडगिद्दी संदीप धोत्रे बसवराज हमाले श्याम वायदंडे वैभव जाधव रितेश रणसुभे उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.