Type Here to Get Search Results !

बिडी कारखाने संप न करता कामगारांना किमान वेतन मिळावे किमान वेतन हक्क समितीचे जिल्हाधिकारी यांना निवेदन

 



सोलापूर (प्रतिनिधी ) 

सोलापूर बिडी उद्योग संघाने शासनाने जाहीर केलेले किमान वेतन महिला विडी कामगारांना देणे परवडत नसल्याने 1 सप्टेंबर पासून कारखाने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे हा निर्णय कामगार विरोधी व शासन आणि कामगार संघटनेना बदनाम करण्याचा प्रयत्न बिडी मालक संघ करीत असून 1 सप्टेंबर चा संप रद्द करून पूर्ववत कारखाने सुरू ठेवावे आणि शासनाने जाहीर केल्याप्रमाणे विडी कामगारांना किमान वेतन मिळावे या मागणीसाठी बिडी कामगार किमान वेतन हक्क समितीच्या वतीने मा जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांना बिडी कामगार किमान वेतन हक्क समितीचे डॉ. गोवर्धन संचू विष्णू कारमपुरी(महाराज), सायबण्णा तेग्गेळी,राहुल गुजर, यांच्या नेतृत्वाखाली विडी कामगारांच्या शिष्टमंडळाद्वारे निवेदन देण्यात आले 

या प्रसंगी जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी समितीच्या सर्व प्रमुखांची आणि विडी कामगारांची पूर्ण म्हणणे ऐकून घेतले आणि मी स्वतः कारखानदारांना 1 सप्टेंबर पासून चा नियोजित बिडी कारखाने बंद मागे घेण्याचे सूचना दिले आहेत आणि या सूचनेस मालक वर्गाने सकारात्मक विचार करून बंद मागे घेण्याचे जाहीर केले त्याचबरोबर बिडी कामगारांच्या किमान वेतनाबाबत महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेला किमान वेतनाची अंमलबजावणी करण्यास प्रयत्न करीन असे आश्वासन जिल्हाधिकारी यांनी किमान वेतन हक्क समितीच्या शिष्टमंडळास दिले आहे 

डॉ. गोवर्धन सुंचु,विष्णू कारमपुरी(महाराज), सायबण्णा तेग्गेळी,राहुल गुजर यांच्या नेतृत्वाखाली शिष्ट मंडळात शारदा गुंडेटी विष्णू गुंडेटी मीनाक्षी मादासनंदिनी जिंदल ओम गुजर लक्ष्मीबाई इप्पा सुवर्णा चनमल सुरैय्या मणियार, आमिना शेख,लक्ष्मी कोंडले रेखा आडकी विठ्ठल कुराडकर गुरुनाथ कोळी श्रीनिवास बोगा आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.