सोलापूर (प्रतिनिधी )
अहोरात्र नागरिकांच्या सुरक्षेसाठी व रक्षणासाठी तत्पर असणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी 'एकता महिला मंच'च्या वतीने एक विशेष व स्नेहपूर्ण उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. दिनांक ३१ ऑगस्ट २०२६ रोजी सलगर वस्ती पोलीस ठाणे, येथील पोलीस बांधवांना तसेच महिला पोलीस कर्मचाऱ्यांना राखी बांधून रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या प्रसंगी सलगर वस्ती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीशैल्य गजा आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वरांजली खामकर यांच्यासह सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी आवर्जून उपस्थित होते. सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या कौतुकास्पद उपक्रमासाठी 'एकता महिला मंच'च्या प्रमुख पदाधिकारी आणि सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
राखी बांधल्यानंतर पोलीस अधिकारी व पोलीस बांधवांच्या वतीने उपस्थित सर्व महिला भगिनींना वृक्षारोपणाचा संदेश देत भेट म्हणून प्रत्येकी एक झाड (रोप) देण्यात आले.
कार्यक्रमा दरम्यान 'एकता महिला मंच'चे प्रमुख प्रभाकर क्षीरसागर यांनी या स्तुत्य उपक्रमाविषयी सविस्तर माहिती दिली. तसेच मंचच्या सोलापूर जिल्हा प्रवक्त्या रंजना गवळी यांनी देखील 'एकता महिला मंच'च्या विविध सामाजिक कार्याविषयी माहिती देऊन उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले.यावेळी पोलीस निरीक्षक श्रीशैल गजा सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वरांजली खामकर पोलीस अंमलदार दिलीप विधाते, सागर सुरवसे व इतर कर्मचारी.उपस्थित होते या प्रसंगी
एकता महिला मंचचे प्रमुख प्रभाकर क्षीरसागर,सोलापूर जिल्हा प्रमुख लक्ष्मी सुतार जिल्हा प्रवक्त्या रंजना गवळी. एकता महिला मंच डोणगाव (तालुका उत्तर सोलापूर) येथील पदाधिकारी व सदस्या: सावित्री पाटील, प्रीती येरनाळे, संजीवनी शेळके, रेखा शेळके, कविता देशेट्टी, सुवर्णा गायकवाड, राणी दगडे, सुरेखा शेळके, नीलगंगा यरनाळे, सोनाली येरनाळे, दुर्गा चौगुले, रंजना आसबे आदी महिला सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
यावेळी
पोलीस निरीक्षक श्रीशैल गजा म्हणाले की
तुम्ही प्रथमच या पोलीस स्टेशनला आलात आणि आम्हा पोलीस अधिकारी व बांधवांना राखी बांधली. दैनंदिन कामाच्या व्यस्ततेमुळे आम्हाला रक्षाबंधनाला गावी जाणे शक्य होत नाही, पण आज तुम्ही स्वतः येऊन राखी बांधल्याने मनापासून आनंद झाला. एकता महिला मंचच्या या उपक्रमाचे मी कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
