सोलापूर (प्रतिनिधी ) पुण्यातील राहुल गांधी यांच्या 'छात्रौ की गुंज 'या कार्यक्रम दरम्यान विध्यार्थ्यांच्या समस्या आणी त्यांच्या आवाज निर्भीडपणे मांडणारे एबीपी माझा चे पत्रकार मंदार गोंजारी यांच्यावर COEP प्रशासनाने दाखल केलेला गुन्हा पाठीमागे घेणे बाबत पत्रकार सुरक्षा समिती ने आक्रमक भूमिका घेतली असून सोलापूर चे जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन निवेदन सादर केले आहे
*पत्रकारांवरील खोटे गुन्हे खपवून घेतले जाणार नाहीत*- प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार
पत्रकारिता एक वसा ध्यास अन चळवळ असून समाजातील वंचित पिढीत घटकांच्या मूलभूत न्याय हक्कासाठी राज्यात अनेक पत्रकार प्रामाणिकपणे काम करत असून समाजाचे प्रश्न प्रशासन दरबारात मांडून अन्यायग्रस्त अत्याचार ग्रस्त लोकांच्या व्यथा लेखणीच्या माध्यमातून मांडत असतात आकस बुद्धीने अश्या प्रकारचे गुन्हे दाखल करणे यंत्रणेला न शोभणारे आहे लोकांचे प्रश्न समस्या अडचणी आणी वैचारिक भूमिका मांडणारे पत्रकार हल्ली कमी होत चाललेले आहेत. उत्तम अन चांगले पत्रकार जशी माध्यम समूहांची गरज आहे तशीच ती एक सामाजिक गरज देखील आहे बातमी लावण्यावरून गुन्हे दाखल होत असतील तर पत्रकारिता करायची कशी ? असा संतप्त सवाल प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांनी प्रशासनाला विचारला असून पत्रकारांवरील खोटे गुन्हे खपवून घेतले जाणार नाहीत असा इशारा देखील यावेळी दिला आहे
या प्रसंगी पत्रकार सुरक्षा समितीचे जिल्हा संघटक अरुण सिडगिद्दी सोलापूर शहर कार्याध्यक्ष राजू वग्गू समन्वयक लक्ष्मण सुरवसे सचिव रमेश दग्गारी संघटक गणेश निंबाळकर विष्णू सकट संदीप धोत्रे श्याम वायदंडे वैभव जाधव बसवराज हमाले रितेश रणसुभे इत्यादी पत्रकार मोठया संख्येने उपस्थित होते.

