Type Here to Get Search Results !

वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त मनोजकुमार यादव यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर.

 



​सोलापूर (प्रतिनिधी )

स्वातंत्र्य दिन निमित्ताने केंद्रीय गृह मंत्रालयाकडून देशातील पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या मानाच्या पदकांची १४ ऑगस्ट रोजी घोषणा करण्यात आली. यात सोलापूर शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त मनोजकुमार माधवराव यादव यांना त्यांच्या उत्कृष्ट, शौर्यपूर्ण आणि निष्कलंक सेवेची दखल घेत मानाचे 'राष्ट्रपती पोलीस पदक' जाहीर झाले आहे. 


मनोज कुमार यादव हे मूळचे सोलापूरचे आहेत. त्यांची 

​३१ मार्च १९९५ रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत थेट पोलीस उपनिरीक्षक म्हणून पोलीस दलात रुजू झाले. गेल्या ३१ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेत त्यांनी मुंबई, नागपूर, सोलापूर, ठाणे आणि पुणे अशा विविध ठिकाणी उत्कृष्ट काम केले आहे. त्यांच्या धडक आणि कौशल्यपूर्ण तपासामुळे अनेक क्लिष्ट गुन्ह्यांची उकल झाली असून, अनेक गुन्हेगारांना जन्मठेपेसारख्या कठोर शिक्षा झाल्या आहेत. कायदा व सुव्यवस्था राखणे, दंगल नियंत्रण आणि व्हीआयपी बंदोबस्त यात त्यांनी नेहमीच विशेष कौशल्य दाखवले आहे.


​घोडेगाव येथे सराईत गुन्हेगाराला पकडताना झालेल्या चकमकीत त्यांनी अजोड शौर्य दाखवले होते. यापूर्वी त्यांना राज्य शासनाचे विशेष सेवा पदक, केंद्रीय गृह मंत्रालयाचे आंतरिक सुरक्षा सेवा पदक आणि पोलीस महासंचालक सन्मानचिन्हाने गौरवण्यात आले आहे. त्यांच्या या प्रदीर्घ आणि देदीप्यमान कारकिर्दीचा आता राष्ट्रपती पदकाने सन्मान होणार आहे. त्यांच्या या यशाबद्दल पोलीस दलात कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.