Type Here to Get Search Results !

महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने स्वातंत्र्य दिन साजरा - प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांच्या हस्ते झेंडावंदन.

 



सोलापूर (प्रतिनिधी ) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष प्रणित महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने कुचन नगर येथील कामगार सेना कार्यालयासमोर स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आले.

 प्रारंभी भारत माता प्रतिमेचे पुजन जेष्ठ विडी कामगार लक्ष्मीबाई ईप्पा यांच्याहस्ते करण्यात आले. त्यानंतर तिरंगा झेंडा पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष - यशवंत पवार यांच्या हस्ते फडकविण्यात आला झेंडावंदन नंतर सामूहिक राष्ट्रगीत करण्यात आले यावेळी विष्णू कारमपुरी (महाराज) यांनी स्वातंत्र्य मिळण्यासाठी शहीद झालेल्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांना श्रद्धांजली वाहून सर्व सोलापूरकर वासियांना शुभेच्छा दिल्यानंतर उपस्थित सर्व विडी कामगार कामगार सेना पदाधिकारी व बालगोपालांना मिठाई वाटप करण्यात आले.

         सदर प्रसंगी मुनिनाथ कारमपुरी, प्रसाद जगताप, विठ्ठल कुऱ्हाडकर प्रसाद जगताप, विजय निली, श्रीनिवास बोगा, पप्पू शेख,, रेखा आडकी,श्रीकांत कुसुरकर, लक्ष्मीबाई कोणापुरे,गीता जक्कर, प्रीती आडकी, प्रथमेश आडकी,अमिता शेख, लक्ष्मी कोंडले, सुरेय्या मणियार, सुवर्णा चनमल यांच्यासह विडी कामगार सेना पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.