सोलापूर (प्रतिनिधी )6/8/26 ते ०७/०८/२०२६ सकाळी ०७.०० या चे दरम्यान प्लॅटिनो अपार्टमेंट, केएलई शाळेजवळ, जुळे सोलापूर येथे मीटर वायरींचे बंडल चोरून नेले बाबत विजापूर नाका पोलीस ठाणे येथे गु.र.नं.४२४/२०२६, भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०५(अ), ३३१ (४) प्रमाणे गुन्हा नोंद झाला होता त्याअनुषंगाने विजापूर नाका पोलीस स्टेशन कडील डी.बी. पथक प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतलकुमार गायकवाड व डी.बी. पथकातील पोलीस अंमलदारांनी घटनास्थळावरील तसेच आसरा चौक, अमन चौक, नई जिंदगी परिसरातील ५० ते ६० सी.सी.टी.व्ही. फुटेज व माहिच्या आधारे एकास ताब्यात घेवून त्याकडे गुन्हयाचे अनुषंगाने चौकशी केली असता त्याने व त्याचे इतर तीन साथीदारांनी मिळून त्या ठिकाणी असलेल्या आर. आर. केबल कंपनीचे १.५ एमएमचे ४५ बंडल व आर.आर. केबल कंपनीचे ६ एमएमचे ०५ बंडल ईलेक्ट्रीक वायरची चोरी केल्याचे कबुल केले सदर गुन्हयातील चोरीस गेलेल्या वायरींचे बंडल व गुन्ह्यात वापरलेली रिक्षा असा एकुण ६,७५,५००/- रु चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त एम. राजकुमार पोलीस उपायुक्त प्रितम यावलकर सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीमती विजयालक्ष्मी कुर्री वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण, पोनि/सुशांत वराळे (गुन्हे) व गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख शीतलकुमार गायकवाड, आप्पा पवार सचिन हार अजय परदेशी गणेश शिर्के लक्ष्मीकांत फुटाणे, शंकर भिसे राजु पवार समाधान मारकड अमृत सुरवसे राहुल विटकर, संतोष माने शाबोद्दीन आबादीराजे संतोष चानकोटी रमेश कोर्सेगाव स्वप्नील जाधव श्रीरंग काशिद यांनी पार पाडली
आरोपींची नावे
१) सर्फराज अ. वहाब पटवेघर . प्लॉट नं. १५, साईनाथ नगर सोलापूर
२) अनिस उस्मान शेख. रा. १०६ भिमाशंकर नगर, नई जिंदगी, सोलापूर
३) रेहान जमील शेख नागनाथ नगर, नई जिंदगी, सोलापूर.
४) अमीन युनुस शेख इस्माईल बेकरी जवळ, नई जिंदगी, सोलापूर
