सोलापूर (प्रतिनिधी
अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे कर्मचारी श्रीशैल गवंडी यांचे चिरंजीव आदीत्य गवंडी याचा १८ वा वाढदिवस वटवृक्ष स्वामी मंदिरात उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मंदीर समितीचे चेअरमन महेश इंगळे-प्रथमेश इंगळे यांनी श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, शाल, हार घालून
आदित्य गवंडी याचा सत्कार केला.
वाढदिवसानिमित्त आदित्य गवंडी यांनी स्वामींचे व मंदीर समितीचे चेअरमन महेश मालक इंगळे यांच्या चरणी नतमस्तक होत दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. स्वामींच्या कृपेने आदित्य यांच्या आयुष्यातील प्रत्येक दिवस सुख, समृद्धी आणि यशाचा जावो अशी प्रार्थना यावेळी अशी प्रार्थना या वेळी मंदीर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी केली. यावेळी प्रथमेश इंगळे, अक्षय सोनटक्के, ओंकार महाडीक, तन्मय इचगे, तुषार मोरे, समर्थ स्वामी इत्यादी उपस्थित होते.
