Type Here to Get Search Results !

कंबरेला पिस्टल घेऊन फिरणाऱ्या गनमॅन ला विजापूर नाका पोलिसांनी ठोकल्या बेडया वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांच्या नेतृत्वात शीतलकुमार गायकवाड यांची दमदार कारवाई

 



सोलापूर (प्रतिनिधी) बेकायदेशीरपणे गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसे जवळ बाळगणाऱ्या एका इसमास विजापूर नाका पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून देशी बनावटीचे एक गावठी पिस्तूल, पाच जिवंत काडतुसे, दोन मोबाईल व मोटारसायकल असा एकूण १ लाख ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.


विजापूर नाका पोलिस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख शितलकुमार गायकवाड व पथकातील पोलिस अंमलदार कर्तव्यावर असताना, गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, विजयपूर ते सोलापूर मार्गावर स्प्लेंडर प्लस मोटारसायकल क्रमांक KA28HF2336 वर एक इसम अंगावर रेंगाचे टी-शर्ट व जीन्स पॅन्ट घालून गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसे घेऊन फिरत आहे.मिळालेल्या माहितीची खात्री करून पोलिस पथकाने पंचांसह संबंधित ठिकाणी कारवाई केली. दि. १९ ऑगस्ट २०२६ रोजी पहाटे सुमारे २.२६ वाजता संशयित इसमास ताब्यात घेण्यात आले.


आरोपी मंजुनाथ शांतप्पा निरणशेट्टी (वय ३१, व्यवसाय-खाजगी नोकरी, रा. मुळपो. शांतेंश्वर गल्ली, इंडी ग्रामीण, ता. इंडी, जि. विजयपूर, कर्नाटक) असे आहे.त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यातून एक देशी बनावटीचे लोखंडी बॉडी असलेले गावठी पिस्तूल, पाच जिवंत काडतुसे, दोन मोबाईल व मोटारसायकल असा १ लाख ३६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला. पिस्तूल बाळगण्याबाबत परवाना आहे का, अशी विचारणा केली असता त्याच्याकडे कोणताही परवाना नसल्याचे निष्पन्न झाले.

याप्रकरणी विजापूर नाका पोलिस ठाण्यात गु.र.नं. ४५५/२०२६, भारतीय हत्यार कायदा कलम ३(२५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीस दि. १९ ऑगस्ट रोजी सकाळी ५.२० वाजता अटक करण्यात आली आहे.पोलिस कोठडीत आरोपी मंजुनाथ निरणशेट्टी याच्याकडे गावठी पिस्तूल व काडतुसे कोठून आणली याबाबत चौकशी केली असता, त्याने हे पिस्तूल व काडतुसे इंडी येथील त्याचा मित्र धनश्याम दल्लीचंद जाट याच्याकडून घेतल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी तपासाची दिशा निश्चित केली असून, संबंधित व्यक्तीचा शोध घेऊन पुढील कारवाई सुरू आहे.ही कारवाई पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उपायुक्त (परिमंडळ) प्रितम यावलकर सहाय्यक पोलीस आयुक्त विजयलक्ष्मी कुर्री वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली सदर ची कामगिरी 

.सहाय्यक पोलीस निरीक्षक शितलकुमार गायकवाड  व त्यांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकातील

अप्पासाहेब पवार सचिन हार अजय परदेशी लक्ष्मीकांत फुटाणे शंकर भिसे गणेश शिर्के संतोष माने स्वप्नील जाधव राजू पवार समाधान मारकड अमृत सुरवसे राहुल वीटकर शाबोद्दीन आबादीराजे संतोष चानकोटी रमेश कोर्सेगाव श्रीरंग काशीद यांनी पार पाडली

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.