Type Here to Get Search Results !

आम्रपाली छमछम ऑर्केस्ट्रा बारवर मंद्रूप पोलिसांची धाड, बारबालासह 10 जणांवर कारवाई, तब्बल 4 लाख 82000/ हजारांचा मुद्देमाल जप्त




सोलापूर (प्रतिनिधी ) मंद्रुप पोलीस ठाणे हद्दीतील सोलापूर ते विजापूर रोड वरील वडकबाळ गावच्या शिवारात आम्रपाली ऑर्केस्ट्राबार विनापरवाना व विविध नियमांचे उल्लंघन करून ऑर्केस्ट्राबार चालु असल्याची गोपनीय माहीती पोलीस निरीक्षक, शंकर पटवारी यांना मिळाल्याने पोलीस ठाणे कडील पथका मार्फत वरीष्ठांच्या मार्गदर्शनखाली कारवाई करत १० पुरूष व ०४ महीलां विरूध्द

मंद्रुप पोलीस ठाणे येथे गुरनं ३३१ / २०२६ बीएनएस २९६, ३(५) वगैरे कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. सदर कारवाई मध्ये ऑर्केस्ट्राबार मधून ४,८२,००० (चार लाख ब्याऐंशी हजार ) रूपये किंमतीचे ऑर्केस्ट्राबार मधील साहीत्य, मोटर सायकल व रोख रक्कम पोलीस पथकाने जप्त करून आरोपीं नामे १) सुप्रिया कुमार मोदल वय १९ रा. सुभाष पाली बारासात नॉर्थ २४ परगणा पश्चिम बंगाल, २) नेहा सिंकदर मलीक वय २४ रा. ९४ टालीगंज रोड कोलकाता पश्चिम बंगाल ३) राक्षी दिपककुमार संधा वय २० रा. कैतुका नंदन बरण बिहार, सध्या सोरेगांव ता. उत्तर सोलापूर ४) रूबी किशोरी पटेल वय २३ रा. नरकटीया पुर्वी चम्पारण बिहार सध्या सोरेगांव ता. उत्तर सोलापूर, ५) मनोज माधव पाटील बार चालक रा.प्लॉट नंबर ९१ पापारामनगर विजापूर रोड सोलापूर, ग्राहक ६) अमर अशोक तोडकर वय २५ वर्ष

रा.पंचशील नगर इंडी जि. विजापूर ७) विरेश बसवराज शेटटर रा . इंडी जि. विजापूर राज्य कर्नाटक ८)

परमानंद उदयकुमर पोतदार वय २३ रा. गांधी चौक इंडी जि. विजापूर कर्नाटक, ९) बसवराज शांताप्पा

कुंटोजी वय २१ वर्ष रा. मार्केट यार्ड इंडी जि. विजापूर राज्य कर्नाटक १०) शांताप्पा साहेबांना हदगल

वय २८ रा. शांतेश्वर टेम्पल विजापूर राज्य – कर्नाटक, १९) सोमय्या बसय्या मठपती वय ३६ रा बगले

प्लॉट इंडी विजापूर राज्य कर्नाटक, १२) महमंद हिदायतुला माशाळकर वय ५० वर्ष रा. शापेट मेनरोड

विजापुर राज्य कर्नाटक १३) उमरफारूक अब्दुललतीफ बगली वय ३६ रा. के. के. जियस जपळ कासगीरी गल्ली विजापूर कर्नाटक व कामगार १४) रियाज हारून आवटे वय २८ वर्ष रा. मंद्रुप तालुका दक्षिण सोलापूर यांच्या विरूध्द मंद्रुप पोलीस ठाणे येथे विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.





सदरची कामगिरी मा.पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे अपर पोलीस अधीक्षक श्रीमती प्रेरणाकट्टे उपविभागीय पोलीस अधिकारी सुरज जगताप यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शंकर पटवारी पोलीस उपनिरीक्षक राज डांगे श्रेपोसई चंद्रकांत कदम पोहेकॉ श्रीराम आदलिंग उत्तम सासवे, सिंकदर मुल्ला अश्पाक मियावाले बिरण्णा वाघमोडे, महीला पोलीस अंमलदार पुजा काळे, विदया कांबळे नानासाहेब अवघडे यांनी ही कामगिरी बजावली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.