Type Here to Get Search Results !

सुहास कदम यांचा 'मटका व्यवसायाशी थेट संबंध दिलीप कोल्हे यांचा पत्रकार परिषदेत गंभीर आरोप




सोलापूर (प्रतिनिधी ) स्वतःला सामाजिक कार्यकर्ते म्हणवणारे सुहास कदम हेच अवैध सट्टा व मटका व्यवसायाशी संबंधित असल्याचा गंभीर आरोप माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांनी शनिवारी पत्रकार परिषद मध्ये केला. कदम यांच्या कथित गैरव्यवहारांची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांनी केली. दुसरीकडे, कदम यांनी केलेल्या आरोपावर बोलताना सायरा शेख म्हणाल्या, आपल्यावरील आरोप निराधार आहेत. संबंधित आर्थिक 

व्यवहारांचे आरटीजीएस वरून झालेले पुरावे आपल्याकडे उपलब्ध असल्याचा दावाही त्यांनी केला.


पत्रकार परिषदेत बोलताना कोल्हे यांनी सुहास कदम यांच्यावर विविध गुन्हे दाखल असल्याचा दावा केला. तसेच सरकारी नोकरी, टेंडर मिळवून देण्याचे आमिष, आर्थिक फसवणूक, अवैध सट्टा मटका व्यवसायाशी संबंध तसेच आंदोलनाच्या नावाखाली खंडणी उकळण्याचे आरोपही त्यांनी केले. या सर्व आरोपांची सक्षम यंत्रणेमार्फत चौकशी करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.


     *सायरा शेख यांनी आरोप फेटाळले*


सायरा शेख यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावताना ३० जून रोजी आपण प्रथम पोलिसांकडे लेखी तक्रार दिली आहे. त्यानंतरच सुहास कदम यांनी ऑनलाइन तक्रार दाखल केल्याचा दावा त्यांनी केला. मी व्याजाने पैसे देते हा आरोप खोटा असून संबंधित सर्व आर्थिक व्यवहार बँकेच्या आरटीजीएसद्वारे झाले आहेत. त्याचे पुरावे आपल्याकडे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.