Type Here to Get Search Results !

पत्रकार सुरक्षा समितीचा राज्यस्तरीय 'आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६' प्रा. दत्तात्रय बनसोडे यांना जाहीर.

 


सोलापूर (प्रतिनिधी ) शैक्षणिक, सामाजिक व प्रशासकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे प्रा. दत्तात्रय सत्यभामा महादेव बनसोडे यांना पत्रकार सुरक्षा समिती, महाराष्ट्र राज्यचा प्रतिष्ठेचा 'राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६' जाहीर झाला आहे. पत्रकार सुरक्षा समितीच्या राज्य कार्यकारिणीने त्यांच्या बहुआयामी कार्याची दखल घेत हा पुरस्कार जाहीर केला आहे.

बहुआयामी कारकीर्द  

M.A. (प्रथम श्रेणी, Special English), B.Ed, M.S.W, D.S.M, D.M.C & J अशा उच्च शैक्षणिक पात्रता असले प्रा. बनसोडे १९९८-९९ पासून इंग्रजी विषयाचे अध्यापन करत आहेत. जून २०२४ पासून मुख्याध्यापक म्हणून जबाबदारी सांभाळत असून, मार्च २०२६ पासून चिंतामणी माध्यमिक आश्रम शाळा, मुळेगाव तांडा येथे कार्यरत आहेत.

प्रशासकीय सेवेतही त्यांनी ठसा उमटवला आहे. २०१० पासून सहायक आयुक्त, समाजकल्याण कार्यालय, सोलापूर व २०२३ पासून सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, सोलापूर या पदांवर त्यांनी काम केले आहे.

समाजकारण व संघटन  

पीडित, शोषित, वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. ऍट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत पीडितांना अर्थसहाय व न्याय मिळवून देणे, कार्यशाळांद्वारे जनजागृती करणे ही कामे त्यांनी सामाजिक न्याय विभागात केली. सोलापूर पूर्व विभागातील नागरिकांना शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे विश्वस्त म्हणून ते कार्यरत आहेत.

प्रहार न्यायमंच या शिक्षक संघटनेचे सोलापूर जिल्हा सहसंपर्क प्रमुख, महाराष्ट्र राज्य बहुजन कर्मचारी महासंघाचे क्रियाशील सदस्य, सोलापूर जिल्हा प्रवासी संघ व पत्रकार सुरक्षा समितीचे सदस्य म्हणूनही त्यांचे योगदान आहे. 

शैक्षणिक कार्य  

२००६ मध्ये शांतिदूत शिक्षण प्रसारक मंडळ, किणी, ता. अक्कलकोटची स्थापना करून ते संस्थापक सचिव म्हणून कार्यरत आहेत. रयत शिक्षण संस्थेच्या धर्तीवर संस्थेचा विस्तार करण्याचे त्यांचे स्वप्न आहे. १९९४ साली दयानंद महाविद्यालयात Special English या विषयात प्रथम क्रमांक मिळवणे हा त्यांच्या शैक्षणिक कारकिर्दीतील मानाचा तुरा आहे.

शिक्षक, प्रशासक, समाजसेवक, संस्थाचालक आणि पत्रकार सुरक्षा समितीचे सदस्य अशा विविध भूमिकांमधून त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेत हा पुरस्कार जाहीर झाल्याने शिक्षण व सामाजिक क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे. पुरस्कार वितरण सोहळ्याची तारीख लवकरच जाहीर होणार आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.