Type Here to Get Search Results !

सोलापुरातील दोघांकडे सापडले तीन लाख रुपये किंमतीचे एमडी ड्रग्ज सदर बझार पोलिसांची दमदार कारवाई; दोघांना पोलीस कोठडी




सोलापूर (प्रतिनिधी ) येथील मुजम्मील हबीब कोथिंबीरे (वय २९, रा. साखर पेठ) व नीलेश बसवराज बिळूर (वय २७, रा. काडादी चाळ, रेल्वे स्थानकाजवळ) यांच्याकडून तीन लाख रुपयांचे एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले. शनिवारी (ता. ११) रात्री सदर बझार पोलिसांनी दोघांना अटक केली. न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.


शनिवारी रात्री सदर बझार पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख सहायक पोलिस निरीक्षक राहुल सावंत यांच्या नेतृत्वाखालील पथक हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी सिद्धार्थ


चौकातील पाण्याच्या टाकीजवळ दोन तरुण संशयास्पदरीत्या थांबलेले दिसले. पोलिसांची गाडी पाहताच ते पळून जाण्याच्या तयारीत होते. मात्र, पोलिसांनी तत्काळ त्यांना ताब्यात घेतले.


दोघांकडून


एकूण १४.७१ ग्रॅम ड्रग्ज जप्त करण्यात आले त्यांच्याकडील दोन हजार रुपये रोख आणि दोन मोबाईलही हस्तगत करण्यात आले आहेत


दोन्ही तरुण पहिल्यांदाच पोलिसांच्या रेकॉर्डवर आले आहेत. न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.


ही कारवाई पोलिस आयुक्त एम.राजकुमार उपायुक्त प्रितम यावलकर सहाय्यक पोलीस आयुक्त विजयालक्ष्मी कुर्री वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे पोलीस निरीक्षक रवींद्रनाथ भंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल सावंत यांच्या नेतृत्वात पोलीस अंमलदार संतोष पापडे, मुलाणी राजेश चव्हाण, बागलकोटे, प्रमोद पकाले विशाल बोराडे, उमेश चव्हाण, हणमंत पुजारी, परशुराम म्हेत्रे, अमीन शेख, सागर गुंड, सोमनाथ सुरवसे, काशिनाथ वाडेकर आणि आनंद निंबाळकर यांच्या पथकाने केली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.