Type Here to Get Search Results !

पत्रकार सुरक्षा समिती चा राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार लोकप्रधान न्यूज चॅनल युवा पत्रकार नारायण घंटे यांना जाहीर

 



सोलापूर (प्रतिनिधी ) गेल्या नऊ वर्षापासून पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र वतीने महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांच्या संदर्भात वेगवेगळे स्वरूपाचे आंदोलन उपोषण निवेदन व राज्य सरकारकडे पत्रव्यवहार करून राज्यातील पत्रकारांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत असून ज्येष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना पत्रकारांसाठी विमा योजना घरकुल योजना आरोग्य योजना राज्यातील पत्रकारांची शासन दरबारात नोंदणी यादीवर नसलेल्या साप्ताहिक वृत्तपत्रांना पूर्वीप्रमाणे जाहिराती अधिस्वीकृती पत्रिका मधील जाचक अटी रद्द करणे खंडणी सारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या पत्रकारांबाबत स्वतंत्र सेवानिवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी राज्यातील यूट्यूब व पोर्टलला शासकीय मान्यता राज्यातील वृत्तपत्राच्या ज्येष्ठ संपादकांना दरमहा 20 हजार रुपये पेन्शन यासह राज्यातील पत्रकारांवर होणारे हल्ले धमकी मारहाण पत्रकारांना पत्रकारिता बरोबरच पूरक व्यवसाय करून समाजामध्ये ताट मानेने जगता यावे म्हणून राज्यातील पत्रकारांना विना अट व विना जामीन पाच लाख रुपये शासकीय बँकेतून कर्ज उपलब्ध करून देण्याबाबत पत्रकार सुरक्षा समिती राज्य सरकारकडे आंदोलन उपोषण निवेदनच्या माध्यमातून पाठपुरावा करत आहे पत्रकारांच्या बाबतीत पत्रकार सुरक्षा समिती नेहमीच आक्रमक भूमिका घेऊन राज्यातील पत्रकारांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत आहे त्याच बरोबर सामाजिक बांधिलकी म्हणून समाजात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तीनां पत्रकार सुरक्षा समिती वतीने त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा म्हणून दरवर्षी विविध मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह व सन्मान पत्र देऊन सत्कार केला जातोय पत्रकार सुरक्षा समिती चा राज्यस्तरीय पुरस्कार 2026 चा आदर्श पत्रकार म्हणून लोकप्रधान न्यूज चॅनल चे युवा पत्रकार नारायण घंटे 

 यांना जाहीर केल्याची माहिती पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार कार्यकारी प्रदेश अध्यक्ष रामचंद्र सरवदे मराठवाडा विभाग कार्याध्यक्ष प्रवीण राठोड पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष कलीम शेख सोलापूर जिल्हा अध्यक्ष राम हुंडारे उपाध्यक्ष अमर पवार सोलापूर शहर अध्यक्ष आन्सर तांबोळी(बी एस) यांनी दिली आहे.


*नारायण घंटे यांचा अल्प परिचय* 

नारायण घंटे हे दक्षिण सोलापूर तालुक्यातील मनगोळी गावचे रहिवाशी असून लोकप्रधान न्यूज चॅनल चे तालुका प्रतिनिधी म्हणून काम पहात आहेत त्यांचे शिक्षण BA. B.Ed पर्यंत झाले असून पत्रकारिता मध्ये त्यांनी डिप्लोमा केलेला आहे 2025 मध्ये सिनानदीला आलेल्या महापुराच्या बातम्या आपला जीव धोक्यात घालून त्यांनी ग्राउंडवर जाऊन केल्या आहेत ते सोलापूर महानगर पालिका मध्ये परिवहन विभागात कंत्राटी वाहक म्हणून काम करत असून नौकरी सांभाळून पत्रकारिता करत आहेत युवा पत्रकार नारायण घंटे यांच्या पत्रकारितेची पत्रकार सुरक्षा समितीने दखल घेऊन त्यांना राज्यस्तरीय आदर्श पत्रकार म्हणून पुरस्कार जाहीर केला आहे हा पुरस्कार जाहीर झाल्याने दक्षिण सोलापूर तालुक्यातील पत्रकारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून युवा पत्रकार नारायण घंटे यांचे सर्वत्र अभिनंदन जात आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.