Type Here to Get Search Results !

पोलिस पंढरपुरात अन दरोडेखोर सोलापूरात बीबी दारफळ, अक्कलकोट रोडवर पकडले ११ दरोडेखोर, सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ यांची धडाकेबाज कारवाई

 







सोलापूर (प्रतिनिधी ) शहरासह जिल्ह्यातील पोलिस ठाण्यातील बरेच अधिकारी, अंमलदार आषाढी वारीच्या बंदोबस्तासाठी पंढरपुरात आहेत. या संधीचा फायदा घेऊन दरोड्यासाठी आलेल्या परजिल्ह्यातील दोन टोळ्यांतील २१ जणांना पोलिसांनी जेरबंद केले.


बीड, अहिल्यानगर व जालना येथून नोलापुरात दरोड्यासाठी आलेल्या पाच जणांना स्थानीक गुन्हे शाखेच्या पथकाने केली अटक . सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानदेव वाघ यांच्या नेतृत्वातील पथकाने या पाच जणांना सोमनाथ नगर बीबी दारफळ रोडवरील साठे दरबार धाब्याजवळ पकडले. न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली . शुक्रवारी (ता. २४) त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत झाली. यात बीड 

जिल्ह्यातील सुरज भारत पवार (रा. राजुरी नवगण), नितीन अंकुश गायकवाड (रा. शिक्षक कॉलनी, बीड) यांच्यासह सचिन गणपत पिंगळे (रा. निमगाव शिर्डी), भागवत नामदेव जाधव (रा. चिंचोळी, जालना) आणि सोलापुरातील लिमयेवाडीचा निखील गायकवाड यांचा समावेश आहे. दुसरीकडे अक्कलकोट रोडवरील जिओ पेट्रोल पंपाजवळील ब्रिजखाली थांबलेल्या सहा जणांना अक्कलकोट उत्तर पोलिसांनी पकडले. यात सचिन माशाळकर, राजू काळू पवार, सचिन भीमराव माशाळकर, बाळू नवनाथ माशाळकर, विशाल महादेव काळोखे व विकास रामनाथ खवले (सर्वजण रा. पाथर्डी, अहिल्यानगर) यांचा समावेश आहे. सहायक पोलिस निरीक्षक अमोल पन्हाळकर तपास करीत आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.