Type Here to Get Search Results !

डिव्हाईडर मध्ये अपघात झालेल्या मोटर सायकलची डमी आणि प्रबोधनाचा फलक, अपघात कमी होण्यासाठी कामती पोलीस ठाण्याचा अभिनव उपक्रम.

 



सोलापूर (प्रतिनिधी )
वाढते अपघाताचे प्रमाण आणि होणारी जीवितहानी याला आळा बसावा यासाठी कामती पोलिस स्टेशनच्या वतीने विविध प्रकारे वाहनधारक व नागरिकांचे प्रबोधन केले जात आहे. यातीलच एक भाग म्हणून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन तसेच चुकीच्या पद्धतीने क्रॉस करणे, चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करणे, वेगावर नियंत्रण, हेल्मेट वापर याविषयी महामार्गावरील रस्त्यावर विविध ठिकाणी जनजागृतीचे फलक लावण्यात आले आहेत. बेगमपूर याठिकाणी असलेल्या डिव्हाईडरच्या मध्यभागी अपघात झालेल्या डमी मोटार सायकलची प्रतिकृती ठेवण्यात आली आहे. या डमी कडे पहिल्यानंतर वाहन धारकांमध्ये एक प्रकारचे अपघाताचे चित्र समोर उभे राहते. यामुळे वाहन चालवताना काळजी घेऊन चालवले पाहिजे अशा प्रकारचा विचार नागरिकांमध्ये निर्माण होत आहे. 

या उपक्रमाबद्दल कामती पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बसवेश्वर जकीकोरे आणि त्यांच्या अंमलदारांचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.