सोलापूर (प्रतिनिधी ) गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख पोलीस उप निरीक्षक अल्फाज शेख व त्यांच्या पथकातील पोलीस अंमलदार पोकों. १६९८ सुहास अर्जुन यांना गोपनीय बातमी मिळाली की, नितीन नगर येथील कोंड्याल शाळेच्या पाठीमागे एक इसम येणार असून निळसर रंगाच्या स्पोर्टस बॅगमध्ये, एक देशी बनावटीचे गावठी पिस्टल आहे.पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख यांनी सदरची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाऊराव बिराजदार दुय्यम पोलीस संगीता पाटील व वरिष्ठांना कळविली.पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख व त्यांचे पथकातील नमूद ठिकाणी कारवाई करणेसाठी पंचांना घेवून रात्री २०:१६ वा संशयीत इसम रोहित रघुनाथ अहिरे वय २० वर्षे, मुळ रा. पंढरपूर अर्बन बँकेजवळ, पंढरपुर ता. पंढरपूर जि. सोलापूर. सध्या रा सेंटलमेंट फ्रि कॉलनी, सोलापूर यास ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता, रोहित रघुनाथ अहिरे याच्या बॅग मध्ये एक देशी बनावटीचे गावठी पिस्टल, पाच जिवंत काडतुसे व रोख रक्कम रु. ५,५०,०००/- असा मुद्देमाल मिळून आला.
संशयित रोहित रघुनाथ अहिरे यास गावठी पिस्टल बाळगण्याच्या परवान्या बाबत विचारणा केली असता त्याचेकडे शस्त्र बाळगण्याचा कोणताही परवाना नसल्याचे सांगितले. सदरचे गावठी पिस्टल, काडतुस हे कोठून व कोणाकडून आणले व जवळ बाळगण्याचा उद्देश काय आहे? तसेच त्याचेकडे मिळून आलेली रोख रक्कम कोणाची आहे ? याबाबत विचारणा केली असता, त्याने सदरचे पिस्टल, काडतूस व रोख रक्कम ही त्याचा मित्र प्रदीप हुसेनी गायकवाड रा. सेटलमेंट फ्रि कॉलनी नं.६, सोलापूर याने काही दिवसापूर्वी ठेवण्यास दिलेली आहे असे सांगितले रोहित रघुनाथ अहिरे यास अधिक विश्वासात घेवून, मुददेमालाबाबत चौकशी केली असता, त्याने सांगितले की, प्रदिपने काही दिवसापूर्वी ही रक्कम व पिस्टल आणि काडतुसे, माझेकडे ठेवून माझ्या वडीलास कर्नाटक पोलीसांनी घरफोडीच्या गुन्ह्यात अटक केली आहे, कर्नाटक पोलीस माझ्या घरी झडती घेण्यासाठी कधीही येवू शकतात, ही रक्कम माझे वडीलांनी अटक करण्यापूर्वी, माझेकडे ठेवण्यास दिली होती ती तुझ्याकडे ठेव. तसेच माझ्याकडे एक पिस्टल पाच राऊंड आहेत, तेही तुझ्याकडे ठेव. " अशी हकिकत सांगितलली सदर चा मुद्देमाल हा त्याचा मित्र प्रदीप हुसेनी याने ठेवण्यास दिल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने रोहित रघुनाथ अहिरे व त्याचा मित्र प्रदीप हुसेनी गायकवाड याचे विरुध्द गुन्हा रजि नं. ६७४/२०२६ शस्त्र अधिनियम कलम ३, २५ सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १२४, १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून रोहित अहिरे यास अटक करण्यात आली असून, प्रदीप हुसेनी गायकवाड याचा शोध सुरु आहे. आरोपी रोहित अहिरे याचे विरुध्द सलगर वस्ती व सदर बझार पोलीस स्टेशन सोलापूर येथे शरिराविषयी दोन गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. तसेच यातील आरोपी क्र. २ प्रदिप हुसेनी गायकवाड याचे वडील हुसेनी गायकवाड याचेविरुध्द मालाविषयी व शरीराविषयी महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्रप्रदेश या राज्यात विविध गुन्हे दाखल आहेत, त्याबाबत माहिती घेण्यात येत आहे.
सदरची कारवाई एम. राजकुमार पोलीस आयुक्त सोलापूर शहर, प्रितम यावलकर पोलीस उपायुक्त परिमंडळ प्रताप पोमण सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग-१ भाऊराव बिराजदार वरिष्ठ पोलीस निरीक्षक एम.आय.डी.सी पोलीस ठाणे श्रीमती संगीता पाटील पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा एम.आय.डी.सी पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख अल्फाज शेख पोलीस उपनिरीक्षक तसेच पोलीस अंमलदार, राकेश पाटील, एकनाथ उबाळे, संदीप जावळे, सचिन भांगे, मंगेश गायकवाड, आमसिध्द निंबाळ, सचिन लवटे आयाज बागलकोटे, सुहास अर्जुन अमर शिवशिंगवाले, नागेशसिंह चव्हाण कुमार बोल्ली अजित माने सकलेन मुकादम अविनाश दिघोळे यांनी केली आहे.
